Shane Warne Ball of the century: तुम्ही शेन वॉर्नचा ‘बॉल ऑफ द सेंचुरी’ पाहिलाय का?, तसा चेंडू कुणीही टाकू शकलं नाही!
Shane Warne Ball of the century: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नचे वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. शेन वॉर्न हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 708 बळी घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे, पण एवढीच त्याची ओळख नाही. वॉर्नने आपल्या गोलंदाजीने भल्याभल्या फलंदाजांना चकमा देत असे. एकदा त्याने एक […]
ADVERTISEMENT
Shane Warne Ball of the century: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नचे वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. शेन वॉर्न हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 708 बळी घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे, पण एवढीच त्याची ओळख नाही.
ADVERTISEMENT
वॉर्नने आपल्या गोलंदाजीने भल्याभल्या फलंदाजांना चकमा देत असे. एकदा त्याने एक असा चेंडू टाकला होता, की ज्याची इतिहासात ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ (Ball of the Century) म्हणून नोंद झाली आहे. तब्बल 90 अंशामध्ये वळालेला त्याचा तो चेंडू असा काही होता की, फलंदाज तर सोडाच समोर उभ्या असलेल्या पंचांना देखील नेमकं काय झालं हे काही क्षण कळालं नव्हतं. एवढा तो भन्नाट चेंडू होता की ज्यावर शेन वॉर्नने इंग्लिश फलंदाजाला बाद केलं होतं. शेन वॉर्नचा तो व्हिडिओ आजही चांगलाच व्हायरल होत आहे.
Ball of the century pic.twitter.com/1tmF6JBMTN
— N. (@Relax_Boisss) March 4, 2022
‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ चेंडूवर आऊट झालेला गेटिंग
हे वाचलं का?
1993 च्या अॅशेस मालिकेदरम्यान शेन वॉर्नने शतकी चेंडू टाकला होता. वॉर्नने 4 जून 1993 रोजी इंग्लंडविरुद्धच्या ओल्ड ट्रॅफर्ड (मँचेस्टर) कसोटीत इंग्लंडचा फलंदाज माईक गेटिंगला अविश्वसनीय पद्धतीने बोल्ड केलं होतं. तो चेंडू पूर्ण 90 अंशाच्या कोनातून फिरला होता. जो पाहून सगळेच थक्क झाले होते. त्यामुळेच त्या चेंडूला आज ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ म्हणून म्हटलं जातं. या एका चेंडूने वॉर्नचे अवघं आयुष्यच बदलून टाकलं होतं.
गेटिंगला टाकलेला वॉर्नचा चेंडू तो चेंडू खरं तर लेग-स्टंपच्या बाहेर पडला होता त्यामुळे तो वाईड असेल असंच प्रत्येकाला वाटलं होतं, म्हणूनच गेटिंगने तो खेळण्याचा प्रयत्न केला नव्हता. पण, वॉर्नने चेंडू असा काही वळवला होता की, जो गेटिंगला चकमा देत थेट ऑफ-स्टंपवर जाऊन आदळला होता. ज्यामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले होते.
ADVERTISEMENT
Shane Warne Death: धक्कादायक.. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर शेन वॉर्नचं वयाच्या 52व्या वर्षी निधन
ADVERTISEMENT
वॉर्ननेच उघड केले होते ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’चे रहस्य
‘बॉल ऑफ द सेंच्युरी’चा खुलासाही खुद्द शेन वॉर्ननेच बऱ्याच वर्षांनी केला होता. तो म्हणाला होता, ‘हा चेंडू आश्चर्यकारक होता. याची मी देखील कल्पना केली नव्हती. मी त्याची पुनरावृत्ती देखील करू शकत नाही. लेग स्पिनर म्हणून तुम्ही नेहमी चांगल्या लेग ब्रेक गोलंदाजीचा विचार करता. मी नेमका तोच चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू ९० अंश फिरला जो खरोखरच विचित्र होता.’ असं वॉर्न म्हणाला होता.
दरम्यान, वॉर्नच्या निधनानंतर शेन वॉर्नचा तोच व्हीडिओ आता पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT