ODI World Cup 2023 : ‘या’ दिवशी भिडणार भारत पाकिस्तान, वेळापत्रक आलं समोर
आयसीसीची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (WTC) स्पर्धा गमावल्यानंतर टीम इंडियाचे (Team India) लक्ष आता वनडे वर्ल्ड कपवर ( one day World cup) असणार आहे. हा वर्ल्ड कप भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. या वर्ल्ड कपचे वेळापत्रक आता समोर आले आहे.
ADVERTISEMENT
आयसीसीची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (WTC) स्पर्धा गमावल्यानंतर टीम इंडियाचे (Team India) लक्ष आता वनडे वर्ल्ड कप 2023 वर ( one day World cup) असणार आहे. हा वर्ल्ड कप भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. या वर्ल्ड कपचे वेळापत्रक आता समोर आले आहे.या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) येत्या 15 ऑक्टोबरला आमने सामने येणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याची उत्सुकता आता क्रिकेट फॅन्सना लागली आहे. (icc odi world cup team india schedule one day wc india vs pakistan match date)
ईएसपीएन क्रिकइंफोने रिपोर्टने दिलेल्या माहितीनूसार, वर्ल्ड कप 2023 ची सुरुवात 5 ऑक्टोबर पासून होणार आहे. या वर्ल्ड कपचा
पहिला सामना अहमदाबादच्या मैदानावर गतविजेता इंग्लंड आणि गेल्या वेळचा उपविजेता न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. तर टीम इंडियाचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईत ऑस्ट्रेलिया विरूद्ध रंगणार आहे. या वर्ल्ड़ कपमधुन भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये 15 ऑक्टोंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना रंगणार आहे.
हे ही वाचा : WTC फायनलमधील टीम इंडियाच्या पराभवाची पाच प्रमुख कारणे
तसेच इतर सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर, 29 ऑक्टोबरला धर्मशालामध्ये ऑस्ट्रेलिया-न्य़ुझीलंड, 1 नोव्हेंबरला पुण्यात न्युझीलंड-साऊथ आफ्रिका तर 4 नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलिया-इंग्लंड आमने-सामने येणार आहे. भारतीय संघाचे ग्रुप स्टेजमधले सामने 9 शहरात खेळवले जाणार आहेत. तर पाकिस्तान संघाचे ग्रुप स्टेजमधले सामने पाच ठिकाणांवर आयोजित असणार आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
टीम इंडियाचे वेळापत्रक
8 ऑक्टोबर vs अफगाणिस्तान, चेन्नई
11 ऑक्टोबर vs अफगाणिस्तान, दिल्ली
15 ऑक्टोबर vs पाकिस्तान, अहमदाबाद
19 ऑक्टोबर vs बांगलादेश, पुणे
22 ऑक्टोबर vs न्यूजीलंड, धर्मशाला
29 ऑक्टोबर vs इंग्लंड, लखनऊ
2 नोव्हेंबर vs क्वालिफायर, मुंबई
5 नोव्हेंबर vs साउथ आफ्रीका, कोलकत्ता
11 नोव्हेंबर vs क्वालिफायर, बंगळुरू
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये 10 संघामध्ये 48 सामने खेळवले जाणार आहेत. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि साऊथ आफ्रिका हे संघ याआधीच वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय झाले आहेत. तर इतर संघाचा निर्णय जिम्बाब्वेमध्ये होणाऱ्या क्वालिफाय टूर्नामेंटमधून होणार आहे.सध्या क्वालिफाय टुर्नामेंटमध्ये वेस्टइंडीज, श्रीलंका, नेदरलॅंड, आयरलॅंड, नेपाल,ओमान, स्कॉटलँड, संयुक्त अरब अमीरात आणि झिम्बाब्वेचा समावेश आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Asia Cup : भारत-पाकिस्तान भांडण मिटलं, ‘या’ मैदानावर येणार आमने सामने
पाकिस्तानचे वेळापत्रक
6 ऑक्टोबर विरुद्ध क्वालिफायर टीम, हैदराबाद
12 ऑक्टोबर विरुद्ध क्वालिफायर टीम, हैदराबाद
15 ऑक्टोबर विरुद्ध भारत, अहमदाबाद
20 ऑक्टोबर विरुद्ध क्वालिफायर टीम, बंगळुरू
23 ऑक्टोबर विरुद्ध अफगाणिस्तान, चेन्नई
27 ऑक्टोबर विरुद्ध साऊथ आफ्रिका, चेन्नई
31 ऑक्टोबर विरुद्ध बांगलादेश, कोलकत्ता
5 नोव्हेंबर विरूद्ध न्युझीलंड, बंगळूरू
12 नोव्हेंबर विरूद्ध इंग्लंड, कोलकत्ता
ADVERTISEMENT
2019 च्या ओडीआय वर्ल्ड कपप्रमाणे यंदा सुद्धा सामने राऊंड रॉबिन प्रारूप रचननेनुसार खेळवण्यात येणार आहे. यानुसार प्रत्येक संघ एक दुसऱ्या विरूद्ध एक-एक सामने खेळणार आहे. ग्रुप स्टेजच्या समाप्तीनंतर प्रत्येक संघ 9-9 सामने खेळले असतील. ग्रुज स्टेजमध्ये टॉप चार संघ सेमी फायनलमध्ये आमने सामने येतील. सेमी फायनलचे सामने 15 आणि 16 नोव्हेंबरमध्ये खेळवले जाण्याची शक्यता आहे. तर अंतिम फायनल सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.
दरम्यान अद्याप तरी आयसीसीने वर्ल्ड कपच्या वेळापत्रकाची अधिकृत घोषणा केली नाही आहे. पण बीसीसीआयतर्फे आयसीसीला ड्राफ्ट शेड्यूल पाठवण्यात आले आहे. यावर आता संपूर्ण देशाचे अभिप्राय मागवण्यात आले आहेत. त्यानंतर आयसीसी वर्ल्ड कपच्या वेळापत्रकाची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT