ICC Test Ranking: कोहली आणि रोहितला मोठा धक्का! भारताचा 'हा' डावखुरा फलंदाज चमकला, तर पहिल्या नंबरवर..

मुंबई तक

ADVERTISEMENT

ICC Test Ranking Latest Update
Team India Players In ICC Test Ranking
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आयसीसी टेस्ट क्रिकेट रँकिंगमध्ये भारताच्या या खेळाडूंचा समावेश

point

विराट कोहली, रोहित शर्माला या खेळाडूंनी मागे टाकलं

point

ICC टेस्ट रँकिंगबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

ICC Test Ranking Latest Update : आयसीसी टेस्ट क्रिकेट रँकिंगमध्ये रिषभ पंत टॉप-10 मध्ये सामील झाला आहे. टेस्टमध्ये शानदार वापसी करणाऱ्या पंतने बांगलादेश विरुद्ध झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये शानदार शतक झळकावलं. पंतने 109 धावांची शतकी खेळी केली. रिषभ पंतचा टेस्टमध्ये हा सहावा शतक आहे. या चमकदार कामगिरीमुळं पंतने टेस्टमध्ये टॉप-10 मध्ये कमबॅक केलं आहे.

टेस्ट रॅकिंगमध्ये जो रूट पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या नंबरवर केन विलियमसन आहे. याशिवाय नंबर तीनवर डेविड मिचेल आहे. स्टिव्ह स्मिथ नंबर 4, तर 5 व्या क्रमांकावर भारताचा यशस्वी जैस्वाल आहे. भारताचा रिषभ पंत फंलदाजीच्या टेस्ट रँकिंगमध्ये सहाव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा सातव्या क्रमांकावर आहे.

हे ही वाचा >> Akshay Shinde Encounter : आरोपीला थांबवायला पाहिजे होतं...गोळी का चालवली? हायकोर्टाचा सरकारला संतप्त सवाल

मोहम्मद सिराज आठव्या नंबरवर आहे, तर मार्कस लाबुशेन आठव्या नवव्या क्रमांकावर आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा 10 व्या नंबरवर आहे. बांगलादेश विरुद्ध झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये रोहित शर्मा फ्लॉप ठरला. याशिवाय भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली फलंदाजी टेस्ट रॅकिंगमध्ये 12 व्या क्रमांकावर आहे. कोहलीलाही 5 नंबरचा नुकसान झाला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

गोलंदाजी रॅकिंगमध्ये अश्विन अव्वल स्थानावर

गोलंदाजीत टेस्ट रॅकिंगमध्ये अश्विन नंबर वनवर आहे. दुसऱ्या नंबरवर भारताचा जसप्रीत बुमराह आहे. तिसऱ्या नंबरवर जोश हेजलवुड आहे. तर पॅट कमिन्स चौथ्या क्रमांकावर आहे. पाचव्या क्रमांकावर कगिसो रबाडा, तर रविंद्र जडेजा सहाव्या स्थानी आहे. नेथन लायन सातव्या, श्रीलंकेचा प्रभात जयसूर्याला पाच क्रमांकाचा फायदा झाला आहे. तो आता आठव्या क्रमांकावर आहे. तर नवव्या नंबरवर कायल जेमीसन आणि 10 व्या क्रमांकावर शाहीन अफ्रिदी आहे.

हे ही वाचा >> Optical Illusion Photo :जंगलात लपलीय तरुणी! तीक्ष्ण नजर आहे ना? मग शोधून दाखवा 10 सेकंदात

    follow whatsapp

    ADVERTISEMENT