Akshay Shinde Encounter : आरोपीला थांबवायला पाहिजे होतं...गोळी का चालवली? हायकोर्टाचा सरकारला संतप्त सवाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Akshay Shinde Hearing In High Court,
Akshay Shinde Encounter Case In Mumbai High Court
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

point

न्यायालायाने पोलिसांसह सरकारला झापलं

point

अक्षय शिंदे एन्काऊंटप्रकरणी न्यायालयाकडून प्रश्नांची सरबत्ती

Akshay Shinde Encounter, Mumbai High Court Update : बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणात आरोपी असेलेल्या अक्षय शिंदेचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षयचा एन्काऊंटर केला. या खळबळजनक प्रकारानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली. तसच अक्षयच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालया याप्रकरणी याचिका दाखल केली. अक्षयचा एन्काऊंटर नसून हत्या झाली आहे, असा आरोप त्याच्या आई-वडिलांनी केला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात पार पडली. अक्षयच्या कुटंबीयांच्या बाजूनं वकील अमित कटाणवर यांनी बाजू मांडली. तर हितेन वेणगावकर यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिलं. यावेळी न्यायालयाने पोलिसांसह सरकारला सुनावलं. न्यायालयाने सरकारी यंत्रणेवर प्रश्नांची सरबत्ती केली. 

एन्काऊंटर करणारा अधिकारी कोणत्या बॅचचा आहे?  आरोपीला थांबवायला पाहिजे होतं, त्याच्यावर गोळी का चालवली? . 3 गोळ्या झाडल्या, एक लागली, मग दोन गोळ्या कुठे गेल्या? पिस्तुल की रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली? घटना घडल्यानंतर पोलीस अक्षयचा मृतदेह घेऊन किती वेळानंतर रुग्णालयात पोहोचले? आरोपीने बंदुकीचे लॉक ओपन राऊंड फायर केले का? असे संतप्त सवाल न्यायालयाने उपस्थित केले आहेत. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> ODI Cricket : भारतासाठी रणजी खेळणाऱ्याचं सर्वत्र होतंय कौतुक! 'असा' कारनामा करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू

हा एन्काऊंटर होऊ शकत नाही. एन्काऊंटरची व्याख्या वेगळी आहे. एन्काऊंटर प्रकरणाचा फॉरेन्सिक रिपोर्ट द्या. सामान्य माणूस बंदूक चालवू शकत नाही, सामान्य माणसाला बंदुकीचा स्लायडर चालवता येत नाही. जखमी पोलिस अधिकाऱ्यांचे मेडिकल रिपोर्ट सादर करा, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये संशयास्पद माहिती असल्यास पावलं उचलावी लागतील, असंही निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. 

बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेमुळं एकच खळबळ उडाली. पोलिस अक्षयला तळोजा कारागृहातून बदलापूरला घेऊन जात होते. पोलिसांनी दावा केला आहे की, अक्षयने बंदूक हिसकावून गोळीबार केला. या फायरिंगमध्ये पोलीस निरीक्षक संजय शिंदे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे जखमी झाले.पीआय संजय शिंदे यांनी आरोपी अक्षयला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु, शिंदे यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून अक्षयवर गोळी झाडली आणि या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! तुमची प्रतिक्षा संपली, 'या' दिवशी जमा होणार तिसऱ्या हफ्त्याचे पैसे

    follow whatsapp

    ADVERTISEMENT