Govt Job: इंजीनिअर्स उमेदवारांनी मिळवा सरकारी नोकरी! BHEL कडून निघाली मोठी भरती, 95,000 पगार अन्...
भारत हॅव्ही इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) कडून प्रोजेक्ट इंजीनिअर आणि प्रोजेक्ट सुपरवायझर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मॅकेनिकल आणि विविध विभागांमध्ये BHEL भरती करणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
इंजीनिअर्स उमेदवारांनी मिळवा सरकारी नोकरी!
BHEL कडून निघाली मोठी भरती
कधी आणि कसा कराल अर्ज?
BHEL Recruitment 2026: इंजीनिअर्स उमेदवारांसाठी भारत सरकारच्या मोठ्या कंपनीत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारत हॅव्ही इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) कडून प्रोजेक्ट इंजीनिअर आणि प्रोजेक्ट सुपरवायझर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मॅकेनिकल आणि विविध विभागांमध्ये BHEL भरती करणार आहे. यासाठी, इच्छुक आणि पात्र उमेदवार www.bhel.com या BHEL च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन 12 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज करू शकतात.
काय आहे पात्रता?
प्रोजेक्ट इंजीनिअर पदांसाठी अप्लाय करण्यासाठी उमेदवारांकडे फूल टाइम इंजीनियरिंग/ टेक्नोलॉजी डिग्री किंवा पोस्टग्रॅज्युएट इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिकेशन/ इंस्ट्रूमेंटेशन/ कंप्यूटर सायन्स क्षेत्रांत किमान 60 टक्के गुणांसह डिग्री असणं आवश्यक आहे. तसेच, एसटी (SC)/ एससी (SC) उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रांत किमान 50 टक्के गुणांसह डिग्री असणं गरजेचं आहे. याव्यतिरिक्त, उमेदवारांकडे किमान 5 वर्षे कार्याचा अनुभव असणं महत्त्वाचं आहे. तसेच, प्रोजेक्ट सुपरवायझर पदावर नियुक्त होण्यासाठी संबंधित ब्रांचमध्ये इंजीनिअरिंगची डिग्री आणि 2 वर्षांचा अनुभव ग्राह्य धरला जाईल.
वयोमर्यादा: या भरतीसाठी उमेदवारांसाठी 25 ते 32 वर्षे उच्च वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
किती मिळेल पगार?
प्रोजेक्ट इंजीनिअर पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना दरमहा 95,000 रुपये ते 1,00,000 रुपये पगार दिला जाईल. तसेच, प्रोजेक्ट सुपरवायझर पदावर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 45,000 ते 48,000 रुपये पगार दिला जाईल.










