World Cup साठी टीम इंडियाकडून फायनल स्क्वॉड जाहीर, ‘या’ खेळाडूचा पत्ता कट

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

icc world cup 2023 team india squad announced ravichandran ashwin axar patel rohit sharma
icc world cup 2023 team india squad announced ravichandran ashwin axar patel rohit sharma
social share
google news

Icc world Cup 2023, Team India : येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात वर्ल्ड कपला (World Cup) सुरूवात होणार आहे. या वर्ल्डकपसाठी पुन्हा एकदा टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये ऑलराऊंडर अक्षर पटेलला (Axar Patel) दुखापतीमुळे संघातून आऊट करण्यात आले आहे, तर त्याच्या जागी रविचंद्रन अश्विनला (ravichandran ashwin) संघात संधी मिळाली आहे. खरं तर टीम इंडियासह इतंर टीम्सने आधीच संघ जाहिर केला होता. त्यानंतर 28 सप्टेंबरपर्यंत संघात बदल करण्याची टीम्सना संधी होती. त्यानुसार आता नवीन बदलासह संघ जाहीर करण्यात आला आहे. (icc world cup 2023 team india squad announced ravichandran ashwin axar patel rohit sharma)

टीम इंडियाचा ऑलराऊंडर अक्षर पटेलला दुखापत झाली होती. त्यामुळे आता त्याला संघातून बाहेर करत त्याच्या जागी अनुभवी स्पिनर गोलंदाज रविचंद्रन अश्विनला संधी देण्यात आली आहे. हा एकमेव बदलाव संघात करण्यात आला आहे. बाकी आहे तसाच संघ राहणार आहे.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही अश्विनला संधी देण्यात आली होती, जिथे त्याने दमदार कामगिरी केली होती. तर मालिकेतील तिसर्‍या आणि शेवटच्या वनडेपर्यंतही अक्षर तंदुरुस्त होऊ शकला नव्हता. त्यामुळे आता त्याचा वर्ल्ड कपमधून पत्ता कट करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 

हे ही वाचा : छोट्या भावावर वडिलांचा जास्तच जीव, संतापातून मोठ्या भावाने…, कुटुंब हादरलं

सराव सामने कधी?

भारतीय संघाला वर्ल्डकपपूर्वी 2 सराव सामने खेळायचे आहेत. पहिला सराव सामना 30 सप्टेंबर रोजी गुवाहाटी येथे इंग्लंडविरुद्ध खेळायचा आहे. तर दुसरा सराव सामना 3 ऑक्टोबरला नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे. हा सामना तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान 5 ऑक्टोबरपासून भारतात वर्ल्ड कप 2023 ला सुरुवात होणार आहे. ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 14 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हायव्होल्टेज सामना खेळवला जाणार आहे. तर अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Adam Britton : घृणास्पद! 39 कुत्र्यांसोबत बलात्कार करून हत्या, कारण…

टीम इंडियाच्या सामन्याचे संपूर्ण वेळापत्रक:

8 ऑक्टोबर विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई
11 ऑक्टोबर विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली
14 ऑक्टोबर विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद
19 ऑक्टोबर विरुद्ध बांगलादेश, पुणे
22 ऑक्टोबर विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला
29 ऑक्टोबर विरुद्ध इंग्लंड, लखनऊ
2 नोव्हेंबर विरुद्ध श्रीलंका, मुंबई
5 नोव्हेंबर विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता
12 नोव्हेंबर विरुद्ध नेदरलँड, बंगळुरू

टीम इंडियाचा संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT