Shreyas Iyer : टीम इंडियाला झटका! IPL, WTC मधून श्रेयस राहणार बाहेर, कारण…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Shreyas Iyer Surgery : टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरूद्ध (India vs Australia) तिसरा वनडे सामना खेळत आहे. या सामन्या दरम्यान ऑस्ट्रेलियाचे कर्णधार स्टीव्ह स्मिथने टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर टीम इंडिया प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहे. या सामन्या दरम्यान टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या स्पर्धेतून बाहरे झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.(ind vs aus 3rd odi shreyas iyer undergo surgery out from team india for next 5 month)

टेस्ट सामन्या दरम्यान दुखापत

टीम इंडियाने नुकतीच बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2-1 ने जिंकली होती. या स्पर्धेतील अहमदाबाद टेस्ट सामन्या दरम्यान श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) दुखापत झाली होती. अय्यरच्या पाठीचा खालचा भाग दुखत होता, ज्या कारणास्तव तो फलंदाजीसाठी उतरला नव्हता. हा सामना नंतर ड्रॉ ठरला होता. त्यामुळे टीम इंडियाने ही मालिका 2-1 ने खिशात घातली होती. आता या स्पर्धेनंतर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियात वनडे मालिका रंगलीय. या मालिकेतही त्याला स्थान मिळाले नव्हते.

World Cup 2023 Schedule: अहमदाबाद अंतिम सामन्याचा थरार! पाकिस्तान खेळणार का?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

5 महिने टीममधून बाहेर

श्रेयर अय्यर (Shreyas Iyer) टेस्ट सामन्या दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे 5 महिने टीममधून बाहेर झाला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार,मुंबईतील डॉक्टरांच्या देखरेखीखाली श्रेयस अय्यर आहे. डॉक्टरांनी तीनदा चेकअप केल्यानंतर सर्जरीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तो 5 महिने संघाबाहेर असणार आहे. तसेच श्रेयस अय्यरला लंडनमध्ये स्वत:वर सर्जरी करायची आहे. पण बीसीसीआय़कडून ऑपरेशनचे ठिकाण आणि हॉस्पिटल ठरवण्यात आले नाहीए.

आयपीएल आणि WTC मधून बाहेर

दुखापतीमुळे श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आयपीएल आणि WTCला मुकणार आहे. आयपीएलला यंदा 31 मार्चला सुरूवात होणार आहे. या यंदाच्या आयपीएलच्या हंगामाला श्रेयस अय्यर मुकणार आहे. यासह 7 जुनला लंडनच्या ओव्हल मैदानात पार पडणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यालाही मुकणार आहे. या दोन बड्या स्पर्धेत त्याचा समावेश नसणार आहे.

ADVERTISEMENT

India vs Pakistan : “मोदी साहेबांना माझी विनंती…;” शाहिद आफ्रिदीचं मोठं विधान

ADVERTISEMENT

दरम्यान श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) दुखापतीमुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. श्रेयस अय्यरची कमी मैदानावर संघाला जाणवणार आहे. त्यामुळे टीम इंडिया श्रेयस अय्यरच्या मैदानात वापसीची प्रतिक्षा करतेय. मात्र श्रेयस अय्यरच्या जागी अनेक खेळाडूंना संघात संधी मिळणार आहे.सध्या सुर्यकुमार यादव मैदानात फ्लॉप ठरतोय, मात्र श्रेयस अय्यर संघात नसलेल्याने सुर्याला संधी दिली जाते आहे. मात्र या संधीचे सोने करण्यात तो अपयशी ठरतोय.

तिसऱ्या टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाने चांगली सुरूवात केली आहे.ऑस्ट्रेलियाने नाबाद 50 धावांचा टप्पा गाठलाय. ऑस्ट्रेलिया किती धावांचा डोंगर उभारते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

WTCची शर्यंत संपली! पाहा पॉईंट टेबल, फायनल कोणामध्ये रंगणार?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT