Ind vs Eng 1st Test : पहिल्या डावात भारताला ९५ धावांची आघाडी, लोकेश राहुलचं दमदार कमबॅक

मुंबई तक

इंग्लंडविरुद्ध पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय संघाने आपली पकड बसवली आहे. इंग्लंडचा पहिला डाव १८३ धावांवर संपवल्यानंतर भारताने लोकेश राहुल आणि रविंद्र जाडेजाच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर २७८ धावांपर्यंत मजल मारत पहिल्या डावात ९५ धावांची आघाडी घेतली. मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करणाऱ्या लोकेश राहुलने ८४ तर रविंद्र जाडेजाने ५६ रन्सची इनिंग खेळली. दुसऱ्या दिवसातला उत्तरार्धातला बराचसा खेळ पावसामुळे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

इंग्लंडविरुद्ध पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय संघाने आपली पकड बसवली आहे. इंग्लंडचा पहिला डाव १८३ धावांवर संपवल्यानंतर भारताने लोकेश राहुल आणि रविंद्र जाडेजाच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर २७८ धावांपर्यंत मजल मारत पहिल्या डावात ९५ धावांची आघाडी घेतली. मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करणाऱ्या लोकेश राहुलने ८४ तर रविंद्र जाडेजाने ५६ रन्सची इनिंग खेळली.

दुसऱ्या दिवसातला उत्तरार्धातला बराचसा खेळ पावसामुळे वाया गेला. दुसऱ्या दिवसाअखेरीस भारताने ४ विकेट गमावत १२५ रन्सपर्यंत मजल मारली होती. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला भारतीय संघाने सावध सुरुवात केली. ऋषभ पंतला आऊट करत इंग्लंडने आपल्या मार्गातला एक मोठा अडसर दूर केला. परंतू यानंतर रविंद्र जाडेजाने लोकेश राहुलची भक्कम साथ देत भारताला आघाडी मिळवून दिली. ही जोडी इंग्लंडच्या बॉलर्सना नाकीनऊ आणणार असं वाटत असतानाच जेम्स अँडरसनने लोकेश राहुलला आऊट केलं. त्याने २१४ बॉलमध्ये १२ फोर लगावत ८४ रन्स केल्या.

यानंतर शार्दुल ठाकूर बॅटींगमध्ये आपली चमक दाखवू शकला नाही. परंतू रविंद्र जाडेजाने मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहच्या साथीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. ५६ धावांवर असताना रॉबिन्सनने त्याला माघारी धाडलं. यानंतर भारताच्या शेपटाने इंग्लंडला चांगलाच तडाखा दिला. परंतू रॉबिन्सनने जसप्रीत बुमराहला आऊट करत भारताचा डाव संपवला. इंग्लंडकडून ओली रॉबिन्सनने ५ तर जेम्स अँडरसनने ४ विकेट घेतल्या.

हे वाचलं का?

    follow whatsapp