Ind vs NZ Test : …आणि श्रेयसने बाबांचं स्वप्न पूर्ण केलं, पदार्पणाच्या कसोटीत खडूस शतकी खेळी

मुंबई तक

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कानपूरच्या मैदानावर खेळवण्यात येत असलेला पहिला कसोटी सामना गाजवला तो मुंबईकर श्रेयस अय्यरने. माजी खेळाडू सुनील गावस्कर यांच्याकडून मानाची कॅप मिळवणाऱ्या श्रेयसने पहिलाच कसोटी सामना खेळताना शतक झळकावलं. श्रेयसच्या याच शतकी खेळाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ३०० धावांचा टप्पा ओलांडला. टीम साऊदीच्या बॉलिंगवर १७१ बॉलमध्ये १३ चौकार आणि २ षटकार लगावत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कानपूरच्या मैदानावर खेळवण्यात येत असलेला पहिला कसोटी सामना गाजवला तो मुंबईकर श्रेयस अय्यरने. माजी खेळाडू सुनील गावस्कर यांच्याकडून मानाची कॅप मिळवणाऱ्या श्रेयसने पहिलाच कसोटी सामना खेळताना शतक झळकावलं. श्रेयसच्या याच शतकी खेळाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ३०० धावांचा टप्पा ओलांडला. टीम साऊदीच्या बॉलिंगवर १७१ बॉलमध्ये १३ चौकार आणि २ षटकार लगावत श्रेयसने १०५ धावांची इनिंग खेळली.

गेली अनेक वर्ष श्रेयस अय्यर कसोटी संघात जागा मिळवण्याच्या शर्यतीत होता. आजच्या खेळीच्या निमीत्ताने श्रेयसने आपल्या वडिलांचं जुन स्वप्न पूर्ण करत त्यांची इच्छा पूर्ण केली आहे.

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१७ साली बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकल्यानंतर त्यावेळी राखीव खेळाडू म्हणून संघात असलेल्या श्रेयसचा हातात ट्रॉफी घेतलेला फोटो त्याचे वडीव संतोष अय्यर यांनी What’s app वर DP म्हणून ठेवला होता. आपल्या मुलाला कधी ना कधी भारताकडून कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळेल या एकमेव आशेवर संतोष यांनी गेली ४ वर्ष हा DP बदलला नव्हता. अखेरीस ४ वर्षांनी सर्व योग जुळून आले आणि श्रेयसनेही पदार्पणाची कसोटी खेळताना धडाकेबाज कामगिरी करत आपल्या बाबांचं स्वप्न पूर्ण केलं.

हो, हा What’s app DP माझ्यासाठी खूप महत्वाचा आणि जवळचा आहे. धर्मशाळा मध्ये भारतीय संघ जेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत होता तेव्हा श्रेयसला विराट कोहलीच्या जागेवर Stand By खेळाडू म्हणून संघात जागा मिळाली होती. त्यावेळी सामना जिंकल्यानंतर सर्व खेळाडूंनी श्रेयसला ट्रॉफी हातात धरायला दिली, माझ्यासाठी तो क्षण खरंच खूप मौल्यवान होता”, श्रेयसचे वडील संतोष पीटीआयशी बोलत होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp