SA vs IND : पहिला दिवस लोकेश राहुलचा, धडाकेबाज शतकासह भारताची द्विशतकी मजल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरिअन कसोटी सामन्यात भारतीय संघाने आश्वासक सुरुवात केली आहे. सलामीवीर लोकेश राहुलचं नाबाद शतक आणि त्याला मयांक अग्रवाल, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेने दिलेल्या उत्तम साथीच्या जोरावर भारताने ३ विकेट गमावत २७२ धावांपर्यंत मजल मारली. दिवसाअखेरीस लोकेश राहुल १२२ धावांवर तर अजिंक्य रहाणे ४० धावांवर नाबाद राहिला आहे.

ADVERTISEMENT

टॉस जिंकून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मयांक अग्रवाल आणि लोकेश राहुलने भारतीय डावाची सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी मैदानावर स्थिरावल्यानंतर आफ्रिकन गोलंदाजांना बॅकफूटला ढकलायला सुरुवात केली. पहिलं सत्र या दोन्ही फलंदाजांनी खेळून काढल्यानंतर मयांकने दुसऱ्या सत्रात आपलं अर्धशतक झळकावलं. राहुल आणि मयांकने पहिल्या विकेटसाठी ११७ धावांची भागीदारी केल्यानंतर एन्गिडीने ही जोडी फोडली. ६० धावांवर मयांक अग्रवाल माघारी परतला. यानंतर लगेच दुसऱ्या बॉलवर फॉर्मात नसलेला चेतेश्वर पुजाराही उसळत्या चेंडूवर पिटरसनकडे कॅच देऊन माघारी परतला.

पुजारा माघारी परतल्यानंतर विराट कोहलीने राहुलच्या साथीने भारताचा डाव सावरत पडझड रोखली. चहापानाच्या सत्रानंतर विराटनेही आक्रमक फटके लगावत धावा जमवण्याचा प्रयत्न केला. परंतू एन्गिडीच्या बॉलवर बाहेर जाणाऱ्या चेंडूवर फटका खेळण्याचा मोह विराटला आवरला नाही आणि तो मुल्डरकडे कॅच देऊन माघारी परतला, विराटने ३५ धावा केल्या. दरम्यानच्या काळात लोकेश राहुलने आपलं शतक साजरं करत आपल्याला दिलेली व्हाईस कॅप्टन पदाची जबाबदारी सार्थ ठरवली.

हे वाचलं का?

SA vs IND : राहुलच्या शतकाने संपवला भारताचा दक्षिण आफ्रिकेतला १४ वर्षांचा वनवास

विराट कोहली माघारी परतल्यानंतर अजिंक्य रहाणेने लोकेश राहुलची साथ दिली. गेल्या काही सामन्यांमध्ये खराब कामगिरीमुळे चर्चेत असलेल्या अजिंक्यला या सामन्यात स्वतःचं नाणं खणखणीत वाजवून दाखवणं गरजेचं होतं. सुरुवातीलाच अजिंक्यने काही सुरेख चौकार लगावत स्वतःला मैदानात स्थिरावलं. मैदानात जम बसवल्यानंतर अजिंक्यने एक बाजू लावून धरत लोकेश राहुलला उत्तम साथ दिली. आफ्रिकन गोलंदाजांनी भारताची ही जोडी फोडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला परंतू त्यांना अपयश आलं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी भारत किती मोठी धावसंख्या तयार करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

ADVERTISEMENT

या भारतीय खेळाडूंच्या पत्नी आहेत परदेशी

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT