SA vs IND: ‘सामना जिंकायचा असेल तर दुसरा मार्ग शोधा’, थर्ड अंपायरच्या ‘त्या’ निर्णयावर वादंग

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला वादाची किनार लागली आहे. तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकन कर्णधार डीन एल्गरला थर्ड अंपायरने आश्चर्यकारकरित्या नाबाद ठरवल्यामुळे भारतीय खेळाडूंचा पारा चढला आणि त्यांनी भर मैदानात आपली नाराजी स्टम्प माईकवर बोलून दाखवली.

ADVERTISEMENT

रविचंद्रन आश्विनच्या बॉलिंगवर डीन एल्गर खेळत असताना त्याचा स्टम्पसमोर येऊन बॉल पॅडवर लाडला. भारतीय खेळाडूंनी केलेलं अपिल मैदानावरील पंचांनी उचलूनही धरलं. परंतू DRS मध्ये हा बॉल स्टम्पच्या वरुन जाताना दिसत होता. हे पाहिल्यानंतर कॉमेंट्री पॅनलसह सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं. इतकच नव्हे तर खुद्द मैदानावरील अंपायरही या निर्णयामुळे आश्चर्यचकीत झालेले पहायला मिळाले.

परंतू थर्ड अंपायरचा हा निर्णय भारतीय खेळाडूंना काही पटला नाही. रविचंद्रन आश्विनने मैदानावर लावण्यात आलेल्या स्टम्प माईककडे जात, सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला दुसरा कोणतातरी मार्ग शोधावा लागेल सुपरस्पोर्ट्स असं बोलून दाखवत आपली नाराजी व्यक्त केली. दक्षिण आफ्रिकेत सामन्याचं प्रक्षेपण सुपरस्पोर्ट्स वाहिनीवर होत असून यात DRS ची यंत्रणाही याच वाहिनीची आहे.

हे वाचलं का?

विराट कोहलीनेही स्टम्प माईकसमोर येऊन Well Done DRS, Well Done असं म्हणत आपली नाराजी बोलून दाखवली. या प्रकरणानंतर भारतीय संघाचं सामन्यावरचं नियंत्रण सुटलं. त्याआधी दक्षिण आफ्रिकेच्या धावगतीवर वेसण घालण्यात यश मिळवलेल्या भारतीय गोलंदाजांनी DRS नाट्यानंतर धावा गमवायला सुरुवात केली. ज्याचा फायदा घेत आफ्रिकेने शतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडला. त्यामुळे चौथ्या दिवशी हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे.

SA vs IND : टीम इंडियाचा पाय खोलात, दक्षिण आफ्रिका सामन्यात वरचढ

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT