SA vs IND : टीम इंडियाचा पाय खोलात, दक्षिण आफ्रिका सामन्यात वरचढ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

केप टाऊन कसोटीत भारतीय संघाचा पाय तिसऱ्या दिवसाअखेसीस पुन्हा एकदा खोलात गेला आहे. २१२ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाने तिसऱ्या दिवसाअखेरीस २ विकेट गमावत १०१ धावांपर्यंत मजल मारली आहे. आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी अद्याप १११ धावांची गरज असून या सामन्यासह मालिका जिंकण्याची चांगली संधी त्यांच्याकडे उपलब्ध आहे. दुसरीकडे भारताला या सामन्यात जिंकण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

ADVERTISEMENT

एडन मार्क्रम आणि कर्णधार डीन एल्गरने आफ्रिकेच्या डावाची सावध सुरुवात केली. दोघांनीही काही चांगले फटके खेळत भारतीय गोलंदाजांवर दडपण आणलं. अखेरीस मोहम्मद शमीने मार्क्रमला राहुलकरवी आऊट करत आफ्रिकेला पहिला धक्का दिला. यानंतर मैदानात आलेल्या किगन पिटरसनने कर्णधार डीन एल्गरला चांगली साथ देत आफ्रिकेचा डाव सावरला.

शेवटच्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी सुरेख मारा करत आफ्रिकेच्या धावगतीला वेसण घातली होती. परंतू रविचंद्रन आश्विनच्या बॉलिंगवर कर्णधार एल्गर पायचीत असल्याचं अपील पंचांनी उचलून धरलं. परंतू DRS चा निर्णय आश्चर्यकारकरित्या भारताच्या विरुद्ध गेल्यामुळे मैदानावर कोहलीसह सर्वच खेळाडू नाराज झाले. संतापलेल्या विराटने मैदानात स्टम्प माईवर आपली नाराजी बोलून दाखवली.

हे वाचलं का?

या घटनेनंतर भारतीय संघ सामन्यात बॅकफूटला फेकला गेला. आफ्रिकेच्या दोन्ही फलंदाजांनी परिस्थितीचा फायदा घेत यानंतर काही सुरेख फटके खेळत पटापट धावा जमवल्या. यानंतर भारतीय गोलंदाजांची देहयष्टी काहीशी निराश दिसत होती. अखेरीस शेवटच्या ओव्हरमध्ये बुमराहने डीन एल्गरला माघारी धाडण्यात यश मिळवलं. परंतू तोपर्यंत आफ्रिकेने शतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडला होता. त्यामुळे चौथ्या दिवशी हा सामना जिंकण्यासाठी भारतीय गोलंदाजांना मेहनत घ्यावी लागणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT