IND vs SA: आज पहिला सामना; भारतीय संघाच्या निशाण्यावर दोन मोठे रेकॉर्ड
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. आज पहिला सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवरती खेळवला जाणार आहे. आज होणारा सामना आणि संपुर्ण मालिका जिंकून भारतीय संघाला मोठे रेकॉर्ड करण्याची संधी आहे. ऋषभ पंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच कर्णधार झाला आहे. आणि त्याला भारताल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदाच घरच्या […]
ADVERTISEMENT
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. आज पहिला सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवरती खेळवला जाणार आहे. आज होणारा सामना आणि संपुर्ण मालिका जिंकून भारतीय संघाला मोठे रेकॉर्ड करण्याची संधी आहे. ऋषभ पंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच कर्णधार झाला आहे. आणि त्याला भारताल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदाच घरच्या मैदानावर मालिका जिंकून देण्याची नामी संधी आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-२० मध्ये भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी आहे. भारताने टी-२० मध्ये मागचे १२ सामने लगातार जिंकले आहेत. आजच्या सामन्यात भारताने आफ्रिकेला हरवले तर हा भारतीय संघाचा सलग तेरावा विजय असणार आहे. या विजयासोबतच भारत सलग तेरा सामना जिकणार पहिला संघ ठरणार आहे. आता भारत आणि अफगानिस्तान अव्वल क्रमांकावर आहेत.
भारतीय क्रिकेट संघाने यापूर्वी कधीही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानात टी-२० मालिका जिंकलेली नाही. दोन्ही संघांमध्ये प्रथमच ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेचा संघ दोन वेळा भारत दौऱ्यावर आला होता, मात्र दोन्ही वेळा भारताला मालिका जिंकता आली नाही. आता दक्षिण आफ्रिका तिसऱ्यांदा भारत दौऱ्यावर येत असून, भारताला पहिली मायदेशात मालिका जिंकण्याची संधी आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
२०१५ / २०१६ – दक्षिण आफ्रिका ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळण्यासाठी भारतात आली. दक्षिण आफ्रिकेने तो २-० ने जिंकला.
२०१९ / २०२० – ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिका दुसऱ्यांदा भारतात आला. मालिका १-१ अशी बरोबरीत संपली.
ADVERTISEMENT
भारतीय संघ
ADVERTISEMENT
ऋषभ पंत (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर, अव्वल कुमार, हर्षल पटेल, अरश पटेल, रवी बिश्नोई सिंग, उमरान मलिक.
दक्षिण आफ्रिका
एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, रस्सी व्हॅन डर ड्युसेन, रेझा हेंड्रिक्स, टेम्बा बावुमा, ट्रिस्टन स्टब्स, ड्वाइट प्रिटोरियस, मार्को जॅन्सेन, हेन्रिक क्लासेन, क्विंटन डी कॉक, एनरिक नोरखिया, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी ताबरेजी, नगी, केशव महाराज.
ADVERTISEMENT