Ind vs SL: टीम इंडियाकडून लंकादहन! सॅमसन-जाडेजाकडून श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेला दुसऱ्या टी-२० सामन्यात ७ विकेटने हरवत मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवल्यानंतर भारतीय संघाने घरच्या मैदानात आणखी एक मालिकेवर आपलं नाव कोरलं आहे. श्रीलंकेने विजयासाठी १८४ धावांचं आव्हान भारताने श्रेयस अय्यरचं नाबाद अर्धशतक आणि संजू सॅमसन-रविंद्र जाडेजाच्या फटकेबाजीच्या जोरावर पूर्ण केलं.

ADVERTISEMENT

टॉस जिंकून रोहीत शर्माने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने चांगली सुरुवात करुन दिली. पथुन निशंका आणि धनुष्का गुणथिलका यांनी पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीचा समाचार घेत काही चांगले फटके खेळले. लंकेची ही जोडी भारताला महागात पडणार असं वाटत असतानाच जाडेजाने गुणतिलकाला बाद केलं. यानंतर असलंका आणि मिशाराही झटपट माघारी परतल्यामुळे लंकेचा संघ चांगल्या सुरुवातीनंतरही अडचणीत सापडला.

दिनेश चंडीमलने निशंकाला साथ देत लंकेची बाजू सावरली. चंडीमलच्या साथीने निशांकाने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. परंतू बुमराहने चंडीमलचा अडसर दूर करत लंकेच्या अडचणींमध्ये भर घातली. परंतू अखेरच्या काही षटकांमध्ये निशांका आणि कर्णधार शनकाने फटकेबाजी करुन संघाला १८३ चा टप्पा गाठून दिला. निशांकाने ५३ बॉलमध्ये ११ चौकारांसह ७५ धावांची खेळी केली. भारताकडून पाचही बॉलर्सनी १-१ विकेट घेतली.

हे वाचलं का?

प्रत्युत्तरादाखल भारताची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा दुष्मता चमीराच्या गोलंदाजीवर क्लिन बोल्ड झाला. यानंतर इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी संघाची बाजू सावरली. परंतू छोटेखानी भागीदारीनंतर इशान किशनही माघारी परतला. यानंतर श्रेयस अय्यरने संजू सॅमसनच्या साथीने ८४ धावांची भागीदारी करत सामन्याचा रंगच बदलून टाकला. दोन्ही फलंदाजांनी लंकेच्या गोलंदाजांची धुलाई करत मैदानात चौफेर फटकेबाजी केली. श्रेयसने यादरम्यान आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

३९ धावा काढल्यानंतर संजू सॅमसन माघारी परतला आणि भारताची जमलेली जोडी फुटली. परंतू अनुभवी जाडेजाने श्रेयसला उत्तम साथ देत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. श्रेयसने ४४ बॉलमध्ये ६ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ७४ तर जाडेजाने १८ बॉलमध्ये ७ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ४५ धावा केल्या. या मालिकेतला अखेरचा सामना रविवारी याच मैदानावर खेळवला जाईल.

ADVERTISEMENT

नवजात मुलीचा मृत्यू, आभाळाएवढं दुःख पचवत ‘तो’ मैदानात उतरला; शतक झळकावून स्वतःला केलं सिद्ध

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT