Ind vs Wi : सीनियर खेळाडूंचा पत्ता कट! वेस्ट इंडिज दौऱ्यात युवांना मिळणार संधी

मुंबई तक

ADVERTISEMENT

ind vs wi india tour of west indies rinku singh sarfaraz khan yashasvi jaiswal
ind vs wi india tour of west indies rinku singh sarfaraz khan yashasvi jaiswal
social share
google news

India Tour of West Indies : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा 209 धावांनी लाजीरवाणा पराभव झाला. या पराभवानंतर आता टीम इंडियाच्या सीनियर खेळाडूंचा पत्ता कट होणार आहे. कारण वेस्ट इंडिज दौऱ्यावर आता बीसीसीआय़ युवा खेळाडूंना पाठवण्याची तयारी करते आहे. त्यानुसार आता वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यात आयपीएल 2023मध्ये सर्वोत्कृष्ठ कामगिरी केलेली खेळाडू दिसण्याची शक्यता आहे. या खेळाडूंमध्ये यशस्वी जायसवाल, रिंकू सिंह, सरफऱाज खान आणि वेगवान गोलंदाज मुकेश कुमार यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. (ind vs wi india tour of west indies rinku singh sarfaraz khan yashasvi jaiswal)

ADVERTISEMENT

यशस्वी जायसवाल आणि रिंकू सिंहला संधी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील पराभवानंतर टीम इंडिया एका महिन्याच्या विश्रांतीवर आहे. यानंतर जुलै महिन्यात टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर असणार आहे.या दौऱ्यात 2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी20 सामने खेळवले जाणार आहेत. या दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. टी20 सीरीज बद्दल बोलायचं झालं तर, संघाचे कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे. तर आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या यशस्वी जायसवाल आणि रिंकु सिंहची टी20 संघात निवड होऊ शकते. यशस्वीने राजस्थान रॉयल्सकडून 14 सामने खेळले आहेत. यामध्ये 163.61 च्या स्ट्राईक रेटने 625 धावा त्याने केल्या आहेत. ज्यामध्ये एक शतक 5 अर्धशतकाचा समावेश आहे. तर रिंकू सिंह कोलकत्ताकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. रिंकूने 14 सामन्यात 59.25 च्या स्ट्राईक रेटने 474 धावा केल्या आहेत. या दोन्ही खेळाडूंसह ऋतुराज गायकवाज आणि जितेश शर्माला देखील संघात संधी मिळू शकते.

हे ही वाचा : MS Dhoni : ‘पीआर आणि मार्केटिंग टीमने…’; गौतम गंभीर धोनीबद्दल हे काय बोलून गेला

टेस्टमध्ये ‘या’ खेळाडूंना संधी

टेस्ट सामन्यांसाठी यशस्वी जायसवाल, मिडल ऑर्डरमध्ये सरफराज खान आणि वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला संधी मिळू शकते.
सरफराज खानबद्दल बोलायचे झाले तर त्याचा फर्स्ट क्लास रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. सरफराज खानने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 79.65 च्या सरासरीने 3 हजार 505 धावा केल्या आहेत. यासह विकेटकीपर म्हणून इशान किशन किंवा केएस भरत या दोघांमधून एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

वनडे संघात कोणाला संधी?

वनडे मालिकेसाठी भारतीय संघातील बहुतांश खेळाडू तेच राहतील, जे या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडीचे दावेदार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघात शुभमन गिलसह इशान किशनला तिसरा सलामीवीर म्हणून संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. विराट कोहली, सूर्यकुमार यादव (श्रेयसच्या अनुपस्थितीत), हार्दिक पांड्या यासारखे खेळाडू नक्कीच संघाचा भाग असतील.

हे ही वाचा : ODI World Cup 2023 : ‘या’ दिवशी भिडणार भारत पाकिस्तान, वेळापत्रक आलं समोर

वेस्टइंडीज दौऱ्याचे वेळापत्रक

पहिली टेस्ट मॅच : 12 ते 16 जुलै, डोमिनिका
दुसरी टेस्ट मॅच : 20 ते 24 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन

ADVERTISEMENT

पहिली वनडे : 27 जुलै, ब्रिजटाउन
दुसरी वनडे : 29 जुलै, ब्रिजटाउन
तिसरी वनडे : 1 ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन

ADVERTISEMENT

पहिली टी20 : 3 ऑगस्ट, पोर्ट ऑफ स्पेन
दुसरी टी20 : 6 ऑगस्ट, गुयाना
तिसरी टी20 : 8 ऑगस्ट, गुयाना
चौथा टी20 : 12 ऑगस्ट, फ्लोरिडा
पाचवा टी20 : 13 ऑगस्ट, फ्लोरिडा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT