भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत कोण मारणार बाजी; कोणाचा रेकॉर्ड आहे सरस?
Ind vs Aus ODI Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका 17 मार्चपासून सुरू होत आहे. या वर्षाच्या अखेरीस (ODI World Cup 2023) एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे, अशा परिस्थितीत दोन्ही संघ या मालिकेत आपली पूर्ण ताकद पणाला लावताना दिसतील. (Border Gavaskar test Series ) बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाचा उत्साह उंचावला आहे, […]
ADVERTISEMENT

Ind vs Aus ODI Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका 17 मार्चपासून सुरू होत आहे. या वर्षाच्या अखेरीस (ODI World Cup 2023) एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे, अशा परिस्थितीत दोन्ही संघ या मालिकेत आपली पूर्ण ताकद पणाला लावताना दिसतील. (Border Gavaskar test Series ) बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाचा उत्साह उंचावला आहे, त्यामुळे आता (ODI Series ) वनडे मालिकाही जिंकण्याकडे लक्ष लागले आहे.(India-Australia ODI series to be tight; Who has the best record?)
मात्र, टीम इंडियासाठी हे सोपे असणार नाही. कारण ऑस्ट्रेलियाचा भारतातील रेकॉर्डही खूप चांगला आहे. अशा स्थितीत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियासमोर प्रत्येक आघाडीवर टिकून राहावे लागणार आहे. कारण कांगारू संघाने 2019 मध्ये भारताला त्यांच्या घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेत पराभूत केले होते. आकडेवारीवर नजर टाकल्यास, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 143 सामने झाले आहेत, त्यापैकी ऑस्ट्रेलियाने 80 जिंकले आहेत, तर भारताने 53 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, भारतात झालेल्या एकदिवसीय सामन्यांचा विक्रम पाहिला तर एकूण 64 सामन्यांपैकी ऑस्ट्रेलियाने 30 आणि भारताने 29 सामने जिंकले आहेत.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे: हेड-टू-हेड –
भारत (1980-2020)