IND vs ENG T20 WC : भारताचा दारुण पराभव; फायनलमध्ये पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड भिडणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अॅडलेड (वृत्तसंस्था) : टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला. भारताचं 169 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या बटरल – हेल्स जोडीनं भारताच्या गोलंजादांची अक्षरशः पीस काढतं संघाला 10 विकेट्सनं विजय मिळवून दिला. त्यामुळे आता फायनलमध्ये पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड असा सामना रंगणार आहे.

ADVERTISEMENT

भारत विरुद्ध इंग्लंड या उपांत्य सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली. गोलंदाजी करण्याच्या कर्णधार बटलरच्या निर्णयाला इंग्लंडच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच सार्थ ठरवलं. इंग्लंडच्या ख्रिस वोक्सने दुसऱ्याच षटकात भारताला पहिला धक्का दिला. त्याने केएल राहुलला झेलबाद केले. केएल राहुल दुसऱ्याच षटकात बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीनं पॉवर प्लेमध्ये चांगली धावगती राखण्याचा प्रयत्न केला.

रोहित-विराटच्या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी केली. मात्र ख्रिस जॉर्डनने 27 धावांवर असताना रोहित शर्माला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर मैदानात आलेल्या सुर्यकुमार यादवलाही चमकदार कामगिरी करता आली नाही. त्याने काही आकर्षक फटके मारले. मात्र तो 10 चेंडूत 14 धावा करुन माघारी परतला.

हे वाचलं का?

रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादव स्वस्तात माघारी परतल्यानंतर विराटने हार्दिकला सोबत घेत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. यावेळी विराटने आपले वर्ल्डकपमधील चौथे अर्धशथक पूर्ण केले. मात्र जॉर्डनच्या पुढच्याच चेंडूवर विराट माघारी परतला. त्यानंतर हार्दिक पंड्याने गिअर बदलत शेवटच्या दोन षटकात झुंजार फलंदाजी केली. त्याने स्वतःचं अर्धशतक आणि संघाचे दीडशतक पूर्ण केलं हार्दिकही शेवटच्या चेंडूवर हिटविकेट झाला.

भारतानं 20 ओव्हर्समध्ये दिलेल्या 168 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या बटरल – हेल्स जोडीनं भारताच्या गोलंजादांची अक्षरशः पीस काढली. जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स या दोन्ही सलामीविरांनी सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत भारताच्या गोलंदाजांना तणावात ठेवण्यात यश मिळवलं.

ADVERTISEMENT

बटलर -अॅलेक्स हेल्सच्या नाबाद शतकी भागदीनंतर भारतापासून सामना दूर गेला. बटलरने 49 चेंडूत 80 धावा फटकावल्या. तर हेल्सने 47 चेंडूत 86 धावा केल्या. या दोन्ही सलामीवीरांच्या जोरावर इंग्लंडनं 16 व्या ओव्हर्समध्येच धावांचा पाठलाग पूर्ण केला अन् अखेरीस भारतावर 10 विकेट्सनं विजय मिळवला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT