Shubman Gill ची पुन्हा वादळी खेळी : डबल सेंच्युरीसह बनला विक्रमवीर
हैदराबाद : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलची झंझावती खेळी पाहायला मिळाली. गिलने या सामन्यात त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमधील पहिले द्विशतक झळकावत विक्रम रचला आहे. लॉकी फर्ग्युसनच्या चेंडूवर सलग ३ षटकार खेचत १४५ चेंडूत गिलने २०० धावा पूर्ण केल्या. अवघ्या ८७ चेंडूत शतक पूर्ण केल्यानंतर पुढच्या ५८ चेंडूत त्याने दुसरे शतक पूर्ण केलं. अखेर […]
ADVERTISEMENT
हैदराबाद : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलची झंझावती खेळी पाहायला मिळाली. गिलने या सामन्यात त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमधील पहिले द्विशतक झळकावत विक्रम रचला आहे. लॉकी फर्ग्युसनच्या चेंडूवर सलग ३ षटकार खेचत १४५ चेंडूत गिलने २०० धावा पूर्ण केल्या. अवघ्या ८७ चेंडूत शतक पूर्ण केल्यानंतर पुढच्या ५८ चेंडूत त्याने दुसरे शतक पूर्ण केलं. अखेर १४९ चेंडूत २०८ धावा काढून तो बाद झाला. त्याच्या या खेळीत १९ चौकार आणि ९ षटकारांचा समावेश होता.
ADVERTISEMENT
या खेळीनंतर एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावणारा शुभमन गिल पाचवा भारतीय तर जागतिक पातळीवरील आठवा फलंदाज ठरला आहे. गिलने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची पीसं काढतं अवघ्या १९व्या डावात द्विशतक झळकावले आहे. आपल्या द्विशतकी खेळीसह शुभमन गिलने या सामन्यात त्याच्या १ हजार धावाही पूर्ण केल्या. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने २१ डावात हजार धावा पूर्ण केल्या होत्या. आता त्यालाही गिलने मागे टाकले आहे.
गिलचे एकदिवसीय कारकिर्दीतील हे पहिलेच द्विशतक ठरले. गिलने यापूर्वी दोन शतक ठोकली आहेत. नुकतचं श्रीलंकेविरुद्ध खेळताना त्याने ११६ धावांची वादळी खेळी खेळली होती. तर त्यापूर्वी झिम्बाब्वे विरुद्ध १३० धावा कुटल्या होत्या. विंडीजविरुद्धही गिलने ९८ धावा केल्या होत्या. अवघ्या २ धावांनी त्याच सेंच्युरी हुकली होती.
हे वाचलं का?
शुभमन गिलने मागच्या काही दिवसांपासून वादळी बॅटिंग करत आहे. त्यामुळे शिखर धवनचे संघात पुनरागमन कठीण मानलं जात आहे. गिलने आतापर्यंत १९ डावांमध्ये हजाराहून अधिक धावा ठोकल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १ द्विशतक, २ शतके आणि ५ अर्धशतके झळकवली आहेत. म्हणजेच या १८ डावांमध्ये गिलने ५० धावांचा आकडा ७ वेळा तर नक्कीच गाठला आहे.
शुभमन गिलची ५०+ खेळ्या :
१. न्यूझीलंड २०२३ – २०८ धावा
ADVERTISEMENT
२. श्रीलंका २०२३ – ११६ धावा
ADVERTISEMENT
३. झिम्बाब्वे २०२२ – १३० धावा
४. विंडीज २०२२ – ९८ धावा
५. झिम्बाब्वे २०२२ – ८२ धावा
६. श्रीलंका २०२३ – ७० धावा
७. विंडीज २०२२ – ६४ धावा
८. न्यूझीलंड २०२२ – ५० धावा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT