Ind vs Pak : …तर चित्र वेगळं दिसू शकलं असतं! माजी खेळाडूने पकडली विराटच्या कॅप्टन्सीमधली महत्वाची चूक
T20 वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्याच सामन्यात पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. मोहम्मद रिझवान आणि बाबर आझमने शतकी भागीदारी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या पराभवानंतर भारतीय संघाच्या कामगिरीची समीक्षा होत आहे. अनेक जणं संघातल्या खेळाडूंवर टीकाही करत आहे. भारताचा माजी गोलंदाज झहीर खानने विराट कोहलीच्या कॅप्टन्सीमधली एक महत्वाची चूक पकडली आहे. भारतीय संघाच्या बॉलिंगदरम्यान विराटने भुवनेश्वर […]
ADVERTISEMENT
T20 वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्याच सामन्यात पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. मोहम्मद रिझवान आणि बाबर आझमने शतकी भागीदारी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या पराभवानंतर भारतीय संघाच्या कामगिरीची समीक्षा होत आहे. अनेक जणं संघातल्या खेळाडूंवर टीकाही करत आहे.
ADVERTISEMENT
भारताचा माजी गोलंदाज झहीर खानने विराट कोहलीच्या कॅप्टन्सीमधली एक महत्वाची चूक पकडली आहे. भारतीय संघाच्या बॉलिंगदरम्यान विराटने भुवनेश्वर कुमार ऐवजी जसप्रीत बुमराहला पहिली संधी द्यायला हवी होती असं झहीरने म्हटलं आहे.
“सामन्याच्या आधी तुम्ही भलेही एखादी रणनिती आखून ठेवलेली असेल. परंतू ज्यावेळी सामन्याला सुरुवात होते त्यावेळी तुम्हाला काही रणनितींमध्ये बदल करावाच लागतो. विराटला बुमराहचा अधिक चांगल्या पद्धतीने वापर करता आला असता. सामना संपल्यानंतर असंच वाटत राहिलं की बुमराहचा चांगल्या पद्धतीने वापर होऊ शकला असता. बुमराह हा संघाचा हुकुमाचा एक्का आहे. त्याला तिसरी ओव्हर देण्याऐवजी त्याच्यापासून सुरुवात करता आली असती. कदाचीत त्यामुळे सामन्याचं चित्र काहीसं वेगळं दिसू शकलं असतं”, झहीर Cricbuzz शी बोलत होता.
हे वाचलं का?
परंतू या सर्व गोष्टी अवघ्या काही क्षणांमध्ये घडतात. मला खात्री आहे की ड्रिंक्स ब्रेकमध्ये भारताच्या थिंक टँकने याबद्दल विचार केला असेल. याव्यतिरीक्त दव हा देखील एक महत्वाचा मुद्दा ठरला. जेव्हा तुम्ही अशा स्पर्धांमध्ये खेळत असता तेव्हा दवाचा मुद्दा लक्षात घेऊन २५-३० रन्स जास्तीच्या करणं गरजेचं असतं, असंही झहीरने स्पष्ट केलं.
T-20 World Cup : पहिल्याच सामन्यात भारताचा पराभव का झाला? जाणून घ्या कारणं..
ADVERTISEMENT
टीम इंडियाचा सध्याचा मेंटॉर आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने भारताच्या या पराभवाचं भाकित करुन ठेवलं होतं. धोनीचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ २०१६ च्या टी-२० विश्वचषकातला आहे. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना धोनीने महत्वाचं वक्तव्य केलं होतं.
ADVERTISEMENT
“अर्थातच आम्हाला या विक्रमाचा (11-0 ने आघाडीवर असल्याचा) अभिमान वाटला पाहिजे. विश्वचषकात आपण पाकिस्तानसोबत कधीही हरलो नाही, या गोष्टीचा अभिमान आहेच, परंतु नेहमीच असेच होईल असे नाही. आज नाहीतर उद्या, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, 20 वर्षांनी कदाचित 50 वर्षांनी, कधीतरी आपण नक्कीच हरणार आहोत.” धोनीच्या या वक्तव्यानंतर ५ वर्षांनी भारताला या गोष्टीचा प्रत्यय आला आहे.
Ind vs Pak : आज नाहीतर उद्या, आम्ही कधीतरी हरुच, धोनीने ५ वर्षांपूर्वी केलं होतं भारताच्या पराभवाचं भाकीत
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT