Ind vs WI : ठरलं ! ‘हा’ खेळाडू येणार रोहित शर्मासोबत सलामीला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत सपाटून मार खाल्ल्यानंतर भारतीय संघ उद्यापासून घरच्या मैदानात वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे. दुखापतीमुळे आफ्रिका दौऱ्याला मुकलेल्या रोहित शर्माने विंडीज दौऱ्यासाठी पुनरागमन केलं आहे. परंतू पहिल्या सामन्याआधीच संघातील महत्वाच्या खेळाडूंना झालेली कोरोनाची लागण यामुळे भारतीय संघाच्या चिंतेत भर पडली आहे. अशातच रोहित शर्मासोबत सलामीला कोण येणार हा प्रश्न निर्माण झाला होता.

ADVERTISEMENT

या प्रश्नाचं उत्तर देत रोहित शर्माने इशान किशनला सलामीला खेळण्याची संधी मिळणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं.

खेळाडूंच्या पाठीशी उभं न राहिल्याने अनिल कुंबळेवर नाराज होता विराट – रत्नाकर शेट्टींचा दावा

हे वाचलं का?

शिखर धवन आणि ऋतुराज गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे भारतासमोरचे दोन पर्याय रद्द झाले आहेत. त्यातच लोकेश राहुल हा दुसऱ्या वन-डे पासून उपलब्ध असणार आहे. भारतीय संघाने खबरदारीचा उपाय म्हणून मयांक अग्रवालला भारतीय संघात जागा दिली आहे. परंतू पहिल्या सामन्यासाठी संघासमोर सध्याच्या घडीला इशान किशनचा पर्याय असल्याचं रोहित शर्माने पत्रकार परिषदेत सांगितलं.

Team India Corona Case: शिखर धवनसह टीम इंडियाचे अनेक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह, WI सीरीजआधी मोठा धक्का

ADVERTISEMENT

भारतीय संघातील शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, नवदीप सैनी (राखीव खेळाडू) यांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला होता. याव्यतिरपीक्त भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमधील तीन जणांनाही कोरोनाची लागण झाली होती. परंतू यानंतरही वन-डे मालिका वेळापत्रकाप्रमाणेच सुरु राहणार असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं होतं. कोविडच्या भीतीमुळे या मालिकेत प्रेक्षकांना परवानगी नाकारण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT