'अंग्रेजों के जमाने का जेलर' ऐन दिवाळीत काळाच्या पडद्याआड, कोणत्या कारणाने मृत्यू?

मुंबई तक

Asrani passed away : 'अंग्रेजों के जमाने का जेलर' ऐन दिवाळीत काळाच्या पडद्याआड, कोणत्या कारणाने मृत्यू? सिनेसृष्टी हळहळली

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'अंग्रेजों के जमाने का जेलर' ऐन दिवाळीत काळाच्या पडद्याआड

point

ज्येष्ठ अभिनेते असरानी यांच्या जाण्याने सिनेसृष्टी हळहळली

Asrani passed away : ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचे सोमवारी दुपारी मुंबईत निधन झाले. 84 वर्षांचे असरानी हे त्यांच्या  विनोदी भूमिकांसाठी आणि शोले चित्रपटातील प्रसिद्ध संवाद “हम अंग्रेजों के ज़माने के जेलर हैं” साठी ते प्रचंड लोकप्रिय होते. त्यांना काही दिवसांपासून श्वसनासंबंधी त्रास होत असल्यामुळे त्यांना जुहू येथील भारतीय आरोग्य निधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

असरानी यांच्या निधनाने संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली असून चाहत्यांकडूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, त्यांच्या निधनामागील खरं कारणेही समोर आली आहेत.

असरानी यांच्या निधनाचं कारण

त्यांचे मॅनेजर बाबूभाई थिबा यांनी पीटीआयशी बोलताना या बातमीची पुष्टी केली. त्यांनी सांगितलं, “ते गेले काही दिवस अस्वस्थ होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी नंतर सांगितलं की त्यांच्या फुफ्फुसांमध्ये पाणी साचलं आहे. दुपारी सुमारे तीनच्या सुमारास त्यांचं निधन झालं.” असरानी यांच्यावर त्याच दिवशी संध्याकाळी सांताक्रूझ स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.  यावेळी त्यांचे जवळचे कुटुंबीय आणि मित्र उपस्थित होते.

असरानी यांचा सिनेसृष्टीतील प्रवास 

जयपूर येथे जन्मलेल्या असरानी यांनी 1960 च्या दशकात अभिनय सुरू करण्यापूर्वी पुणे येथील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था (FTII)मध्ये प्रशिक्षण घेतले होते. 1960च्या दशकात करिअरची सुरुवात केल्यानंतर त्यांनी पाच दशकांहून अधिक काळात 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp