Ind vs WI : मैदानात उतरण्याआधीच विराट कोहलीचं शतक, दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत मिळवलं स्थान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा वन-डे सामना, माजी कर्णधार विराट कोहलीसाठी अत्यंत संस्मरणीय ठरला आहे. मैदानात फलंदाजीला उतरण्याआधीच विराटच्या नावावर शतकाची नोंद झाली आहे. घरच्या मैदानावर विराट कोहलीचा हा शंभरावा वन-डे सामना ठरला आहे.

भारतीय संघाकडून अशी कामगिरी करणारा विराट कोहली पाचवा खेळाडू ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन, महेंद्रसिंह धोनी, युवराज सिंग यांनी अशी कामगिरी करुन दाखवली आहे. विराट कोहलीने आतापर्यंत २५८ वन-डे सामने खेळले असून यात त्याच्या नावावर १२ हजारापेक्षा जास्त धावा जमा आहेत.

Ranji Trophy : मुंबईच्या संघाची घोषणा, युवा पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणार अजिंक्य रहाणे

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

घरच्या मैदानावर खेळताना विराट कोहलीची आकडेवारी तितकीच चांगली आहे. याआधी ९९ वन-डे सामन्यांत विराटने घरच्या मैदानावर ५ हजार २ धावा केल्या असून यात १९ शतकांचा समावेश आहे. सचिन तेंडुलकरने घरच्या मैदानावर १६४ वन-डे सामने खेळत ६ हजार ९७६ धावा केल्या आहेत.

आजच्या सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावलं तर तो घरच्या मैदानात वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांच्या सचिनच्या विक्रमाशी बरोबरी करु शकतो.

ADVERTISEMENT

घरच्या मैदानावर वन-डे क्रिकेट खेळताना भारतीय खेळाडूंची कामगिरी –

ADVERTISEMENT

१) सचिन तेंडुलकर – १६४ सामन्यांत ६९७६ धावा – २० शतकं

२) महेंद्रसिंह धोनी – १२७ सामन्यांत ४३५१ धावा – ७ शतकं

३) मोहम्मद अझरुद्दीन – ११३ सामन्यांत ३१६३ धावा – ३ शतकं

४) युवराज सिंग – १०८ सामन्यांत ३४१५ धावा – ७ शतकं

५) विराट कोहली – ९९ सामन्यांत ५००२ धावा – १९ शतकं

६) राहुल द्रविड – ९७ सामन्यांत ३४०६ धावा – ६ शतकं

विराट कोहली भारताच्या १ हजाराच्या वन-डे सामन्यात सहभागी होता, परंतू या सामन्यात त्याला फलंदाजीत फारशी चमक दाखवता आली नाही. भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात ६ विकेटने विजय मिळवला होता. दरम्यान दुसऱ्या वन-डे सामन्यासाठी भारताने संघात एक बदल केला असून इशान किशनच्या जागेवर लोकेश राहुलला संधी दिली आहे. पहिल्यांदा बॉलिंग करताना विंडीजने धडाकेबाज सुरुवात करत कर्णधार रोहित शर्माला स्वस्तात माघारी धाडलं आहे.

पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय महिलांचा पराभव, न्यूझीलंड १८ धावांनी विजयी

    follow whatsapp

    ADVERTISEMENT