Ruturaj Gaikwad: धोनीनंतर कोल्हापूरचा पठ्ठ्या CSK चा नवा कर्णधार! गाजवणार मैदान

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

CSK New Captain Ruturaj Gaikwad : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 सीझन 22 मार्चपासून सुरू होत आहे. पण त्याच्या एक दिवस आधी चेन्नई सुपर किंग्स (CSK) फ्रँचायझीने एक मोठी घोषणा केली आहे. यावेळी महेंद्रसिंग धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) CSK चा नवा कर्णधार असणार आहे. (Indian Premier League 2024 After Dhoni Kolhapurs Ruturaj Gaikwad is now CSK New Captain)

27 वर्षीय स्टार सलामीवीर ऋतुराज गायकवाड चेन्नई संघाचा चौथा कर्णधार असेल. धोनीशिवाय याआधी रवींद्र जडेजा आणि सुरेश रैना यांनी CSK चं कर्णधारपद भूषवलं आहे. धोनीने 212 सामन्यात चेन्नई संघाचं नेतृत्व केलं आहे. जडेजाने 8 तर रैनाने 5 सामन्यात कर्णधारपद भूषवलं आहे.

2022 मध्ये CSK चे कर्णधार पद जडेजाच्या हाती

IPL 2022 मध्ये देखील चेन्नई संघाने एक दिवस आधी नवीन कर्णधाराची घोषणा केली होती. त्यानंतर रवींद्र जडेजाची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती, पण जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाची कामगिरी वाईट ठरली. यावेळी जडेजाची खेळीही लोकांना फार आवडली नाही. त्यानंतर जडेजाच्या जागी धोनीला मीडसीझनमध्ये पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने 5 वेळा पटकावले विजेतेपद

42 वर्षीय धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र तो आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने (CSK) 5 वेळा विजेतेपद पटकावले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने 2023 च्या शेवटच्या सीझनमध्येही विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर अंतिम फेरीतही त्यांनी गुजरात टायटन्सचा पराभव केला.

 

ADVERTISEMENT

चेन्नई फ्रँचायझीने ऋतुराजला किती कोटींमध्ये केलं खरेदी?  

ऋतुराज गायकवाडने 2020 च्या सीझनमध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो आयपीएलमध्ये 52 सामने खेळला आहे. चेन्नई फ्रँचायझीने ऋतुराजला एका सीझनसाठी 6 कोटी रुपये देत खरेदी केलं आहे. तर धोनीला 12 कोटी रुपये दिले आहेत. अशाप्रकारे गायकवाडची आयपीएलमधील फी धोनीपेक्षा अर्धी आहे.

ADVERTISEMENT

धोनीने आधीच दिला होता इशारा

धोनीने काही दिवसांपूर्वीच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती आणि सूचित केले होते की, तो आता आयपीएल 2024 मध्ये नवीन भूमिकेत दिसू शकतो. त्याच्या या पोस्टने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. धोनीने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले होते की, 'नव्या सीझनची आणि नव्या भूमिकेची वाट पाहू शकत नाही.' या पोस्टमध्ये माहीने त्याची नवीन भूमिका काय असणार आहे हे उघड केले नव्हते मात्र, आता त्याच्या या पोस्टचा अर्थ स्पष्ट झाला आहे.

 

IPL 2024 च्या पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक

  • चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- 22 मार्च, चेन्नई, रात्री 8.00 वाजता

  • पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स- 23 मार्च, मोहाली, दुपारी 3.30 वाजता
  • कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद- 23 मार्च, कोलकाता, संध्याकाळी 7.30 वाजता
  • राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स- 24 मार्च, जयपूर, दुपारी 3.30 वाजता
  • गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स- 24 मार्च, अहमदाबाद, संध्याकाळी 7.30 वाजता
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज- 25 मार्च, बंगळुरू, संध्याकाळी 7.30 वा.
  • चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स- 26 मार्च, चेन्नई, संध्याकाळी 7.30 वाजता
  • सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स- 27 मार्च, हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजता
  • राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स- 28 मार्च, जयपूर, संध्याकाळी 7.30 वाजता
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स- 29 मार्च, बंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजता
  • लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स- 30 मार्च, लखनौ, संध्याकाळी 7.30 वाजता
  • गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद- 31 मार्च, अहमदाबाद, 3.30 वाजता
  • दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज- 31 मार्च, विझाग, संध्याकाळी 7.30 वाजता
  • मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स- 1 एप्रिल, मुंबई, संध्याकाळी 7.30 वाजता
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स- 2 एप्रिल, बंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजता
  • दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स- 3 एप्रिल, विझाग, संध्याकाळी 7.30 वाजता
  • गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज- 4 एप्रिल, अहमदाबाद, संध्याकाळी 7.30 वाजता
  • सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज- 5 एप्रिल, हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजता
  • राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- 6 एप्रिल, जयपूर, संध्याकाळी 7.30 वाजता
  • मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स- 7 एप्रिल, मुंबई, दुपारी 3.30 वाजता
  • लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स- 7 एप्रिल, लखनौ, संध्याकाळी 7.30 वाजता
     

    follow whatsapp

    ADVERTISEMENT