ख्रिस मॉरिसला लॉटरी, युवराजचा विक्रम मोडत ठरला महागडा प्लेअर
चेन्नईत सुरु असलेल्या आयपीएलच्या चौदाव्या सिझनच्या ऑक्शनमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसने सर्वांना आश्चर्यचकीत केलं आहे. ३३ वर्षीय ख्रिस मॉरिससाठी राजस्थान रॉयल्सने १६ कोटी २५ लाख रुपये मोजले आहे. या बोलीसह ख्रिस मॉरिस आयपीएलच्या इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. आयपीएल २०२० साठी पार पडलेल्या ऑक्शनमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सवर कोलकाता नाईट रायडर्सने १५ कोटी ५० लाखांची […]
ADVERTISEMENT

चेन्नईत सुरु असलेल्या आयपीएलच्या चौदाव्या सिझनच्या ऑक्शनमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसने सर्वांना आश्चर्यचकीत केलं आहे. ३३ वर्षीय ख्रिस मॉरिससाठी राजस्थान रॉयल्सने १६ कोटी २५ लाख रुपये मोजले आहे. या बोलीसह ख्रिस मॉरिस आयपीएलच्या इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. आयपीएल २०२० साठी पार पडलेल्या ऑक्शनमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सवर कोलकाता नाईट रायडर्सने १५ कोटी ५० लाखांची बोली लावली होती.
यानिमीत्ताने ख्रिस मॉरिसने युवराज सिंगच्या नावावर असलेला सर्वात महागड्या खेळाडूचा विक्रमही मोडीत काढला आहे. २०१५ साली दिल्लीने युवराज सिंगसाठी १६ कोटी रुपये मोजले होते. महत्वाची गोष्ट म्हणजे ख्रिस मॉरिसची लिलावात बेस प्राईज ही ७५ लाख एवढी होती…या प्लेअरला संघात दाखल करुन घेण्यासाठी मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज हे संघही शर्यतीत होते. यानंतर RCB आणि राजस्थानने या शर्यतीत उडी मारली. अखेरीस राजस्थानने १६ कोटी २५ लाखांच्या बोलीवर मॉरिसला आपल्या संघात दाखल करुन घेतलं आहे.
आयपीएलच्या इतिहासातले आतापर्यंतचे सर्वात महागडे खेळाडू –
१) ख्रिस मॉरिस – १६ कोटी २५ लाख (राजस्थान रॉयल्स) – वर्ष २०२१