IPL 2021 मध्ये पंजाबच्या खेळाडूकडून मॅच फिक्सींग? BCCI च्या अँटी करप्शन युनिटकडून तपासाला सुरुवात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आयपीएलमध्ये मंगळवारी पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघाचा सामना पार पडला. शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या या सामन्यात राजस्थानने पंजाबच्या हातातला विजयाचा घास हिसकावून २ धावांनी बाजी मारली. परंतू या सामन्यात पंजाबच्या खेळाडूवर आता कारवाईची टांगती तलवार आहे.

पंजाब संघाचा खेळाडू दिपक हुडाने सामन्याला सुरुवात होण्याआधी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पंजाबच्या संघाची जर्सी आणि हेल्मेट घातलेला एक फोटो पोस्ट करत त्याला Here We Go अशी कॅप्शन दिली.

दीपक हुडाची हीच पोस्ट आता चर्चेचा विषय ठरली आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात दीपक हुडा पंजाबच्या प्लेइंग ११ मध्ये होता. सामन्याला सुरुवात होण्याआधी दीपकच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अशी पोस्ट येणं म्हणजे फिक्सींग करणाऱ्या लोकांना एका प्रकारचा संदेश देण्यासारखं असल्याचं बोललं जात आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

धक्कादायक ! IPL च्या गोटात पुन्हा Corona चा शिरकाव, SRH च्या टी. नटराजनचा रिपोर्ट पॉजिटीव्ह

महत्वाची गोष्ट म्हणजे बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकानेही दीपक हुडाच्या या पोस्टची दखल घेऊन चौकशीला सुरुवात केली आहे. BCCI च्या अँटी करप्शन युनिटचे प्रमुख शब्बीर हुसेन शेखादाम खांडावाला यांनी ANI शी बोलत असताना या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचं सांगितलं आहे. सामन्याआधी दीपक हुडाने केलेली पोस्ट ही नियमांचा भंग करणारी आहे का याचा तपास सध्या केला जात आहे.

ADVERTISEMENT

IPL 2021 च्या प्रक्षेपणावर Taliban ने घातली बंदी, जाणून घ्या कारण

ADVERTISEMENT

अँटी करप्शन युनिट या पोस्टची चौकशी करेल. आम्ही याआधीच सर्वांना माहिती दिली आहे की संघाबद्दल किंवा प्लेइंग ११ बद्दल सोशल मीडिया किंवा कुठेही चर्चा करायची नाही. स्पर्धेदरम्यान सोशल मीडियावर वावरताना काय करावं आणि काय करु नये याचीही माहिती खेळाडूंना देण्यात आलेली आहे, अशी माहिती ACU च्या एका अधिकाऱ्याने दिली.

IPL 2021 : पंजाबची अखेरच्या ओव्हरमध्ये हाराकिरी, राजस्थान दोन धावांनी विजयी

दरम्यान, राजस्थानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी १८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शतकी भागीदारी केली. मात्र त्यानंतर सामन्याचं चित्र पालटलं. शेवटच्या षटकात पंजाबला ४ धावांची गरज होती. पंजाबच्या हातात ८ गडी होते. पण असं असूनही पंजाबला सामना जिंकता आला नाही. चर्चेत असलेला दीपक हुडाही अखेरच्या ओव्हरमध्ये एकही रन न काढता आऊट झाला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT