IPL 2021 : मुंबईच्या पृथ्वीची दिल्लीत हवा, पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले ६ चौकार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सलामीवीर पृथ्वी शॉने खेळलेल्या ८२ रन्सच्या इनिंगच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाइट रायडर्सचं आव्हान ७ विकेट राखून परतवून लावलं. १५५ रन्सचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पृथ्वी शॉने पहिल्याच ओव्हरमध्ये कोलकात्याच्या शिवम मवीची पिसं काढली. सहा बॉलमध्ये ६ खणखणीत चौकार लगावत पृथ्वी शॉने पहिल्याच ओव्हरमध्ये कोलकात्याला बॅकफूटला ढकललं.

ADVERTISEMENT

IPL 2021 : कोरोनाविरुद्ध लढ्यात राजस्थान रॉयल्सचं मोठं योगदान, ७.५ कोटींची आर्थिक मदत

या धडाकेबाज सुरुवातीनंतर पृथ्वी शॉने अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. अजिंक्य रहाणेनेही २०१२ साली राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत असताना RCB विरुद्ध सामन्यात श्रीनाथ अरविंदच्या बॉलिंगवर ६ फोर लगावल्या होत्या.

हे वाचलं का?

यादरम्यान पृथ्वी शॉने आयपीएल २०२१ मध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम आपल्या नावे जमा केला असून आयपीएलच्या पहिल्या ओव्हरमध्ये सर्वाधिक रन्स काढण्याचा विक्रमही पृथ्वी शॉच्या नावे जमा झाला आहे.

कोलकाता नाईट रायडर्सच्या बॉलर्सची धुलाई करत पृथ्वीने ४१ बॉलमध्ये ११ फोर आणि ३ सिक्स लगावल्या. अखेरीस पॅट कमिन्सने ८२ रन्सवर पृथ्वीची इनिंग संपवली. दरम्यान कोलकात्याने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात अतिशय दणक्यात झाली. फॉर्मात असलेली जोडी पृथ्वी शॉ आणि शिखर धवनने पहिल्या ओव्हरपासून KKR च्या बॉलर्सवर दबाव आणायला सुरुवात केली. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत दोन्ही बॅट्समनही बॉलर आणि फिल्डर्सना सळो की पळो करुन सोडलं. दोन्ही बॅट्समननी पहिल्या विकेटसाठी १३२ रन्सची पार्टनरशीप करत KKR च्या आव्हानातली हवाच काढून टाकली. अखेरच्या टप्प्यात पृथ्वी-शिखर आणि ऋषभ पंतला आऊट करण्यात KKR चे बॉलर यशस्वी ठरले, परंतू तोपर्यं पाणी पुलाखालून वाहून गेलं होतं. स्टॉयनिस आणि हेटमायर जोडीने दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब करत पॉइंट्स टेबलमध्ये आपलं आव्हान कायम राखलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT