दिलदार पॅट कमिन्स ! करोनाविरुद्ध लढाईत पंतप्रधान सहायता निधीला भरघोस मदत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतात प्रत्येक दिवशी कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ, ऑक्सिजनची कमतरता, इंजेक्शनचा तुडवला अशा परिस्थितीमुळे आणीबाणीसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे देश कोरोनाचा सामना करत असताना आयपीएलचा चौदावा हंगाम खेळवला जात आहे. अनेकांनी अशा परिस्थितीत आयपीएलचे सामने खेळवणं कितपत योग्य असा प्रश्न उपस्थित केला. काही खेळाडूंनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचं कारण देत स्पर्धेतून माघारही घेतली. परंतू ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने खडतर काळात भारत सरकारला कोरोनाविरुद्धच्या लढाईत मदत करण्याचं ठरवलं आहे.

ADVERTISEMENT

IPL मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने पंतप्रधान सहायता निधीला ५० हजार डॉलर्सची मदत केली आहे. भारतामधील सध्याच्या खडतर परिस्थितीत महत्वाच्या शहरांमध्ये ऑक्सिजनची असलेली कमतरता लक्षात घेत आपण ही कमतरता दूर करण्यासाठी मदत करत असल्याचं कमिन्सने म्हटलं आहे.

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या आपल्या विशेष मेसेजमध्ये कमिन्सने आपल्या इतर सहकाऱ्यांनाही सध्याच्या खडतर काळात भारताला मदत करण्याचं आवाहन केलं आहे. “गेल्या काही वर्षांमध्ये मी भारतीय लोकांचा प्रेमळ स्वभाव अनुभवला आहे. सध्या भारतात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहून खरंच वाईट वाटत आहे. सध्याच्या परिस्थितीत आयपीएल सुरु ठेवावं की नाही याबद्दल अनेक चर्चा सुरु आहेत. परंतू आम्हाला असं कळवण्यात आलंय की सध्याच्या लॉकडाउन काळात आयपीएल सामन्यांमुळे लोकांना काही तास विरंगुळा तयार होईल. म्हणूनच भारतीयांनी आतापर्यंत माझ्यावर केलेल्या प्रेमाची पोचपावती म्हणून मी मदत करतो आहे.”

हे वाचलं का?

IPL 2021 Explainer : खेळ महत्वाचा की जीव, जाणून घ्या खेळाडू स्पर्धेतून का घेत आहेत माघार?

माझ्या मदतीने फार मोठा फरक पडेल अशातली परिस्थिती नाही, पण अशा छोट्या-छोट्या प्रयत्नांमधून आपण बदल नक्कीच घडवू शकतो असंही कमिन्सने आपल्या सोशल मीडिया मेसेजमध्ये म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

‘खडतर काळात परिवारासोबत असणं माझ्यासाठी गरजेचं’, आश्विनची IPL 2021 मधून विश्रांती

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT