Akash Chopra : IPL मध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव, दिग्गज केमेंटेटर पॉझिटिव्ह
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) कोरोनाने पुन्हा एकदा शिरकाव केला आहे. कारण आयपीएलमधील हिंदी कॉमेंट्री पॅनलमध्ये समाविष्ट असलेला आकाश चोप्रा कोव्हिड पॉझिटिव्ह झाला आहे. खुद्द आकाशने ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT

IPL 2023 Covid 19: मुंबई: इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये कोरोनाने (Corona) पुन्हा एकदा शिरकावा केला आहे. आयपीएल 2023 सीझनमध्ये आज (4 मार्च) दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात सामना होणार आहे, मात्र त्याआधीच कोरोनाबाबतची एक बातमी समोर आली आहे. त्यामुळे आयोजकांची चिंता वाढली आहे. (ipl 2023 covid 19 corona hits again in IPL commentator akash chopra becomes covid positive)
यावेळी आयपीएलमधील हिंदी कॉमेंट्री पॅनलमध्ये समाविष्ट झालेला आकाश चोप्रा कोव्हिड पॉझिटिव्ह झाला आहे. खुद्द आकाशने ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. तसेच, आकाशने त्याच्या यूट्यूब कम्युनिटी पोस्टमध्ये व्यत्ययाबद्दल क्षमस्व असे लिहिले. कोव्हिड पुन्हा एकदा स्ट्राईक केला आहे.
आकाशला कोरोनाने गाठलं
आकाश पुढे म्हणाला की, ‘काही दिवस कॉमेंट्री करू शकणार नाही. मी येथे YouTube वर देखील कमी दिसणार आहे. घसा खराब आहे, त्यामुळे आवाजाचा त्रास होतो. वाईट वाटू नका घेऊ. लक्षणे कमी आहेत यासाठी देवाचे आभार…’
अधिक वाचा- Corona in Maharashtra: मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना पसरतोय; ही आहे ताजी आकडेवारी
आकाश चोप्रानेही एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये तिने लिहिले की, ‘कॉट अँड बोल्ड कोव्हिड. सी व्हायरस पुन्हा एकदा आला आहे. तरीही सौम्य लक्षणे आहेत. सर्व काही नियंत्रणात आहे. काही दिवस समालोचनापासून दूर राहीन. आशा आहे की मी जोरदार पुनरागमन करेन.’
