Virat Kohli शी पंगा घेणारा ‘हा’ खेळाडू IPL मधून ‘आऊट’, कारण…

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ipl 2024 afganistan unlike to given nocs for mujeeb ur rahman fazalhaq farooqi and naveen ul haq vs virat kohli ipl 2023 fight
ipl 2024 afganistan unlike to given nocs for mujeeb ur rahman fazalhaq farooqi and naveen ul haq vs virat kohli ipl 2023 fight
social share
google news

IPL 2024 Virat Kohli vs Naveen Ul Haq : आयपीएल 2024 चे मिनी ऑक्शन पार पडले आहे. या ऑक्शननंतर आता क्रिकेट फॅन्सना आयपीएल 2024 च्या स्पर्धेची उत्सुकता लागली आहे. या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीशी (Virat Kohli) मैदानात पंगा घेणारा क्रिकेटर नवीन उल हक (Naveen Ul Haq) आयपीएलमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. कारण नवीनला बोर्डाकडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC)मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे नवीन उल हक आयपीएल 2024 ची स्पर्धा खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे.(ipl 2024 afganistan unlike to given nocs for mujeeb ur rahman fazalhaq farooqi and naveen ul haq vs virat kohli ipl 2023 fight)

खरंतर दरवर्षी प्रत्येक बोर्ड त्यांचा वार्षिक करार जाहीर करत असते. पण अफगाणिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने खेळाडूंचे वार्षिक करार 2024 पर्यंत लांबवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण आयपीएलमध्ये खेळणाऱ्या मुजीब उर रहमान, नवीन उल हक आणि फलजहक फारूकी यांनी 1 जानेवारीपासुन त्यांना त्यांच्या केंद्रीय करारातून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

हे ही वाचा : Amol Kolhe : अजित पवारांचं चॅलेंज, कोल्हेंना शरद पवारांचा ‘मेसेज’, काय झाली चर्चा?

अफगाणिस्तान बोर्डाच्या करारावर या खेळाडूंनी स्वाक्षरी न करण्याचा आग्रह व्यावसायिक लीगमध्ये भाग घेतल्यामुळे आहे. या खेळाडूंनी अफगाणिस्तानसाठी खेळण्यापेक्षा त्यांच्या वैयक्तिक हितांना प्राधान्य दिले आहे, असे एसीबीने म्हटले आहे. त्यामुळे अफगाणिस्तानने या खेळाडूंविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचाही निर्णय़ घेतला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी त्यांनी एक समितीही गठीत केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान या महिन्यात पार पडलेल्या आयपीएल 2024 च्या लिलावात मुजीबला कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) 2 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते, तर नवीनला लखन सुपर जायंट्सने आणि फारुकीला सनरायझर्स हैदराबादने कायम ठेवले होते. आता तिन्ही खेळाडूंना दिलेली एनओसी त्वरीत रद्द करण्यात येणार आहे. ज्यामुळे आता त्यांना आयपीएलची स्पर्धा खेळण्यास अडचण येणार आहे.

हे ही वाचा : मनोज जरांगेंचा भुजबळांवर पलटवार, ‘पाय तोडण्याची भाषा करणाऱ्यांनी आम्हाला…’,

नवीन-विराट मैदानात का भांडले?

1 मे 2023 ला लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चँलेंजरेस बंगळुरूत आयपीएलचा सामना पार पडला होता. हा सामना आरसीबीने 18 धावांनी जिंकला होता. या सामन्याच्या निकालापेक्षा विराट कोहली आणि नवीन उल हकच्या भांडणाच्या खुप चर्चा रंगली होती. या भांडणात नंतर गौतम गंभीरने देखील उडी घेतली होती. या भांडणाची आयपीएलमध्ये खूप चर्चा रंगली होती.

ADVERTISEMENT

या भांडणानंतर विराट कोहली आणि नवीन उल हक 11 ऑक्टोबरला दिल्लीत समोरा समोर आले होते. यावेळी देखील दोघांमध्ये भांडण होण्याची शक्यता होती. पण विराट कोहलीने दिलदारपणा दाखवत नवीन उल हकची गळाभेट घेतली होती. या गळाभेटीनंतर त्यांच्या आयपीएलमधील भांडणावर पडदा पडला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT