KKR vs SRH Final : कोलकत्ताने तिसऱ्यांदा IPL च्या ट्रॉफीवर कोरलं नाव, सनरायझर्स हैदराबादचा उडवला धुव्वा

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ipl 2024 final kkr vs srh ipl 2024 prize money of winning team and runner up indian premier league
आयपीएल 2024 च्या टॉफ्रीवर कोलकत्ता नाईट रायडर्सने नावं कोरलं आहे.
social share
google news

KKR Won Ipl Trophy 2024 : आयपीएल 2024 च्या टॉफ्रीवर कोलकत्ता नाईट रायडर्सने  नावं कोरलं आहे. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकत्ता संघाने ही कामगिरी केली आहे. सनरायझर्स हैदराबाद प्रथम फलंदाजी करताना 113 धावांवर ऑल आऊट झाली होती. कोलकत्ताने हे आव्हान सहजरीत्या पुर्ण करून 8  विकेटने सामना जिंकत, आयपीएलची ट्रॉफी उंचावली आहे. (kkr won ipl 2024 trophy defeat sunrises hyderabad ipl 2024 final kkr vs srh)

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र प्रथम फलंदाजी करून देखील हैदराबादला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. हैदराबादकडून फक्त कर्णधार पॅट कमिन्सने 25 धावा केल्या. बाकी सगळे खेळाडू 20 धावांच्या आत आऊट झाले होते. त्यामुळे हैदराबाद 18.3 ओव्हरमध्ये 113 धावांवर ऑल आऊट झाली होती. 

हे ही वाचा : विजेत्या संघावर होणार पैशांचा पाऊस, उपविजेत्याला काय मिळणार?

हैदराबादने दिलेल्या या आव्हानांचा पाठलाग करायला उतरलेल्या कोलकत्ताने 10 ओव्हर 3 बॉलमध्ये हे आव्हान सहजरीत्या पुर्ण केले. कोलकत्ताकडून व्यंकटेश  अय्यरने 52 धावांची नाबाद खेळी केली. तर रहमनुल्लाह गुरबाजने 39 धावा केल्या आणि सुनील नरीन आणि श्रेयस अय्यरने प्रत्येकी 6 धावा केल्या. त्यामुळे 8 विकेट राखून कोलकत्ताने हैदराबादचा पराभव केला. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान या आधी कोलकाता नाईट रायडर्सने दोन वेळा चषकावर नाव कोरले होते.  2012 आणि 2014 च्या हंगामात गौतम गंभीरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने चषकावर नाव कोरले होते.आता 2024 साली ट्रॉफी उंचावून कोलकत्ताने विजयाची हँट्ट्रीक साधली आहे. या विजयाचे संपुर्ण श्रेय गौतम गंभीरला जाते. 

हे ही वाचा : Lok Sabha : ''हिंमत असेल तर एक...'', भाजपाचं राऊतांना थेट आव्हान

    follow whatsapp

    ADVERTISEMENT