KKR vs SRH Final : विजेत्या संघावर होणार पैशांचा पाऊस, उपविजेत्याला काय मिळणार? जाणून घ्या बक्षीस रक्कम

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ipl 2024 final kkr vs srh ipl 2024 prize money of winning team and runner up indian premier league
आयपीएलची फानयल जिंकणाऱ्या संघाला आणि उपविजेत्या संघाला किती बक्षीस रक्कम मिळणार? हे जाणून घेऊयात.
social share
google news

IPL 2024 Final Prize Money : आयपीएलच्या 17 व्या सीझनचा फायनल सामना कोलकत्ता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये रंगला आहे. आता या दोन्ही संघामधून कोणता संघ आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरतो?  हे थोड्याच वेळात कळणार आहे. तत्पुर्वी आयपीएलची फानयल जिंकणाऱ्या संघाला आणि उपविजेत्या संघाला किती बक्षीस रक्कम मिळणार? हे जाणून घेऊयात.  (ipl 2024 final kkr vs srh ipl 2024 prize money of winning team and runner up indian premier league) 

ADVERTISEMENT

आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरणाऱ्या संघाला करोडो रुपये मिळणार आहेत, तर फायनलमध्ये पराभूत होणाऱ्या संघाला बंपर बक्षीस रक्कम मिळणार आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेला संघ राजस्थान रॉयल्स आणि चौथ्या क्रमांकावर असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनाही चांगली रक्कम मिळणार आहे. याशिवाय इतर पुरस्कारही देण्यात येणार आहेत. चला जाणून घेऊया कोणत्या पुरस्कारासाठी किती रक्कम मिळणार आहे. 

हे ही वाचा : 'ठाकरेंचे अनेक आमदार शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर...'

बक्षीस रक्कम 

  • विजेता संघ : 20 कोटी रुपये
  • उपविजेता : 12.5 कोटी रूपये
  • तिसऱ्या क्रमांकाचा संघ : ७ कोटी रुपये
  • चौथा संघ : 6.5  कोटी रुपये
  • सर्वाधिक विकेट्स (पर्पल कॅप) : 10 लाख
  • सर्वाधिक धावा (ऑरेंज कॅप) : 10 लाख
  • सीझनचा उदयोन्मुख खेळाडू : 10 लाख 
  • सीझनचा इलेक्ट्रिक स्ट्रायकर : 10 लाख 
  • गेम चेंजर ऑफ द सीझन : 10 लाख
  • कॅच ऑफ द सीझन : 10 लाख
  • मोस्ट वॅल्युबल प्लेअर : 10 लाख 
  • रुपे ऑन द गो-4s ऑफ द सीझन- 10 लाख
  • हंगामातील सर्वात लांब षटकार : 10 लाख
  • पिच आणि ग्राउंड पुरस्कार : 50 लाख 


IPL 2024 मध्ये प्लेऑफसह एकूण 74 सामने आयोजित करण्यात आले आहेत. या कालावधीत एकूण 70 सामने लीग टप्प्यातील होते. साखळी सामने संपल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या चार संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला. तर चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स, लखनौ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स प्ले ऑफमध्ये प्रवेश करू शकले नाहीत.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Lok Sabha : ''हिंमत असेल तर एक...'', भाजपाचं राऊतांना थेट आव्हान

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT