IPL 2021 च्या वेळापत्रकात महत्वाचा बदल, ‘या’ दिवशी दोन नव्या संघांची नावं होणार घोषित

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील उर्वरित सामन्यांना १९ सप्टेंबरपासून युएईत सुरुवात झाली. ही स्पर्धा सुरु होऊन एक आठवड्याचा कालावधी उलटून गेल्यानंतर आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने वेळापत्रकात महत्वाचे बदल केले आहेत. साखळी फेरीतील अजून १४ सामने शिल्लक असून ८ ऑक्टोबर रोजी शेवटचा सामना होईल. त्यानंतर प्लेऑफमधील सामन्यांस सुरुवात होईल.

ADVERTISEMENT

८ ऑक्टोबर रोजी होणारे शेवटचे दोन साखळी फेरीतले सामने एकाच वेळी घेणार असल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे. मंगळवारी (२८ सप्टेंबर) त्यांनी यासंबंधी घोषणा केली आहे.

८ ऑक्टोबर रोजी होणारे आयपीएल २०२१ च्या साखळी फेरीतील शेवटचे २ सामने एकाच वेळी म्हणजे भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता खेळले जातील. यापूर्वी यादिवशी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात दुपारी ३.३० वाजता अंतिम डबल हेडरमधील पहिला सामना होणार होता. अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. त्यानंतर दुसरा सामना दुबई येथे संध्याकाळी ७.३० वाजता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पार पडणार होता. मात्र आता हे दोन्हीही सामने ठरलेल्या ठिकाणीच संध्याकाळी ७.३० वाजता खेळवले जातील.

हे वाचलं का?

IPL 2021 : 10 हजार रन्स, 300 विकेट, पोलार्डचा टी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम

बीसीसीआयने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात वेळापत्रकातील बदलाव्यतिरिक्त आगामी आयपीएल २०२२ मध्ये सहभागी होणाऱ्या नव्या संघांच्या नावांची घोषणा होणार असल्याचंही जाहीर केलंय. २५ ऑक्टोबर रोजी म्हणजेच टी२० विश्वचषकाचा थरार सुरू असताना या नव्या संघांची नावे आयपीएलप्रेमींना कळतील. त्यानंतर लगेचच २०२३ ते २०२७ पर्यंतच्या आयपीएल मीडिया अधिकाऱ्यांसाठी बोर्ड टेंडरचीही घोषणा केली जाईल.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT