कोच म्हणून राहुल द्रविडची आतापर्यंत कामगिरी कशी? जाणून घ्या…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे आयपीएलचा हंगाम मध्यावधीतच स्थगित करावा लागल्यानंतर बीसीसीआयने पुढील आंतरराष्ट्रीय दौऱ्याची तयारी करायला सुरुवात केली आहे. जुन महिन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडमध्ये WTC ची फायनल मॅच आणि इंग्लंडविरुद्ध टेस्ट सिरीज खेळणार आहे. याचदरम्यान बीसीसीआय जुलै महिन्यात भारताचा आणखी एक संघ श्रीलंका दौऱ्यावर पाठवणार आहे.

ADVERTISEMENT

३ वन-डे आणि ३ टी-२० मॅचच्या सिरीजसाठी भारतीय संघाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी राहुल द्रविडवर येणार आहे. सध्या NCA चा संचालक असलेल्या राहुल द्रविडची टीम इंडियाचा कोच म्हणून ही पहिलीच मोठी जबाबदारी असणार आहे.

प्रशिक्षक म्हणून काम करण्याची राहुल द्रविडची ही पहिलीच वेळ नाहीये, याआधी त्याने आयपीएल, भारत अ आणि १९ वर्षाखालील संघाचं प्रशिक्षकपद भूषवलं आहे. त्यामुळे आतापर्यंत राहुल द्रविडची कोच म्हणून कामगिरी कशी राहिली आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करुया…

हे वाचलं का?

२०१२ साली राहुल द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला, यानंतर २०१३ साली त्याने आयपीएलमधूनही निवृत्त व्हायचं ठरवलं. वर्ष २०१४ राहुल द्रविड पहिल्यांदा प्रशिक्षकाच्या भूमिकेत समोर आला.

राजस्थान रॉयल्सने राहुल द्रविडला आपल्या संघाचा मेंटॉर म्हणून नेमलं. मेंटॉर म्हणून पहिल्याच हंगामात राहुलची कामगिरी फारशी उल्लेखनीय नसली तरीही राजस्थानच्या संघातील काही प्रमुख यंगस्टर्सना ग्रुमिंग करण्याचं महत्वाचं काम राहुल द्रविडने केलं. २०१४ मध्ये राजस्थान रॉयल्स पाचव्या स्थानावर आलं…पण त्यांच्यातला आणि मुंबई इंडियन्समधला नेट रनरेटमधला फरक हा अगदी थोडा होता.

ADVERTISEMENT

वर्ष २०१५ – राहुलच्याच मार्गदर्शनाखाली राजस्थान रॉयल्सचा संघ स्पर्धेत तिसरा आला. एलिमिनेटर सामन्यात राजस्थानला RCB कडून पराभव स्विकारावा लागला…पण एकंदरीत संघासाठी आणि राहुलसाठी हा सिझन उल्लेखनीय होता.

ADVERTISEMENT

या दोन वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर बीसीसीआयने राहुलवर नवी जबाबदारी टाकली. India A आणि U-19 च्या संघाचा कोच म्हणून द्रविडची नियुक्ती झाली. इथेही राहुल द्रविडने आपली चमक दाखवली. २०१६ साली बांगलादेशात झालेल्या U-19 वर्ल्डकपमध्ये भारताला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला…पण या स्पर्धेतून ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन यासारखे महत्वाचे प्लेअर्सना मेनस्ट्रिममध्ये आणण्यात राहुलने मोलाची भूमिका बजावली. यादरम्यान २०१६ आणि २०१७ मध्ये राहुलला आयपीएलमध्ये दिल्लीच्या टीमने राहुलला कोच म्हणून संधी दिली…पण इथे मात्र राहुल अपयशी ठरला.

यानंतर २०१७ मध्ये Conflict of Interest चा मुद्दा प्रामुख्याने समोर आला. म्हणजेच बीसीसीआय आणि टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये काम करणाऱ्या लोकांना आयपीएलमध्ये कोणतंही पद भूषवता येणार नाही असा नियम आला. यावेळीही राहुल द्रविडने आयपीएलमधला ग्लॅमरस जॉब सोडून U-19 संघाचा कोच म्हणून काम पाहणं पसंत केलं. आपल्या कामावरची निष्ठा राहुल द्रविडने पुन्हा एकदा सिद्ध केली.

२०१८ मध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया U-19 वर्ल्डकपसाठी न्यूझीलंडला गेली. २०१६ साली संधी गमावलेल्या राहुल द्रविडने त्यावेळी चंग बांधला आणि टीम इंडियाच्या यंगस्टर्सना विजेतेपद मिळवून दिलं. ही स्पर्धा भारतीय क्रिकेटच्या दृष्टीकोनातून महत्वाची यासाठी ठरली कारण सध्या आयपीएलमध्ये झळकणारे पृथ्वी शॉ, शुबमन गिल, कमलेश नागरकोटी, शिवम मवी यासारखे प्लेअर्स द्रविडच्या मार्गदर्शनाखालीच घडले.

यानंतर बीसीसीआयमध्ये बदलाचे वारे वहायला लागले. ,सौरव गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष झाला…आणि त्याने आपल्या विश्वासु सहकाऱ्यावर एक नवी जबाबदारी टाकली. राहुल द्रविडकडे बंगळुरुतल्या National Cricket Academy चं संचालकपद सोपवण्यात आलं. इथे राहुलचं काम प्रकाशझोतात येणारं नसलं तरीही अनेक यंगस्टर्सना मार्गदर्शन करण्यापासून खेळाडूंच्या फिटनेसकडे लक्ष देण्याचं काम राहुल द्रविड आणि त्याची टीम NCA मध्ये करत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT