पिंपरी : रिक्षा चालकाकडून 400 रुपयांची लाच घेतली, महिला वाहतूक पोलिसाला रंगेहात पकडलं
Female traffic police officer caught red-handed while accepting a bribe : महिला वाहतूक पोलिसाला रिक्षा चालकाकडून 400 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं, लाचलुचपत विभागाची कारवाई
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महिला वाहतूक पोलिसाला रिक्षा चालकाकडून 400 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं
लाचलुचपत विभागाची कारवाई
पिंपरी : पिंपरी वाहतूक विभागातील महिला पोलिस शिपाई आणि ट्रॅफिक वॉर्डन यांनी रिक्षाचालकाकडून लाच स्वीकारल्याचा प्रकार उघडकीस आला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दोघांनाही सापळा रचून पकडले आहे. 400 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये पोलिस शिपाई वर्षा विठ्ठल कांबळे (वय 35) आणि ट्रॅफिक वॉर्डन कृष्णा मछिंद्र गव्हाणे (वय 28) यांचा समावेश आहे. दोघांनीही विविध कारणांखाली रिक्षाचालकाकडून लाच मागितल्याचा आरोप आहे.
हेही वाचा : विरोध करायचा असेल तर खुलेपणाने करा, आमच्यासोबत राहून गद्दारी करू नका, अजित पवारांचा माळेगावातून इशारा
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हा पिंपरी, मोरवाडी आणि केएसबी चौक परिसरात प्रवासी वाहतूक करणारा रिक्षाचालक आहे. 17 नोव्हेंबर रोजी जादा प्रवासी घेतल्याचा मुद्दा काढत वर्षा कांबळे आणि कृष्णा गव्हाणे यांनी त्याच्याकडून प्रथम 300 रुपये घेतले. यानंतर 26 नोव्हेंबर रोजी पुन्हा रिक्षा थांबवून दरमहा ‘हप्ता’ म्हणून 500 रुपयांची मागणी केल्याने रिक्षाचालकाने एसीबीकडे तक्रार नोंदवली.










