शिरुर : आमदार ज्ञानेश्वर कटकेंच्या मर्सिडीज कारने 4 वर्षीय चिमुकलीला उडवलं, हवेत फेकल्या गेली अन्..

मुंबई तक

Pune Accident : शिरुर : आमदार ज्ञानेश्वर कटकेंच्या मर्सिडीज कारने 4 वर्षीय चिमुकलीला उडवलं, हवेत फेकल्या गेली अन्..

ADVERTISEMENT

Pune Accident
Pune Accident
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शिरुर : आमदार ज्ञानेश्वर कटकेंच्या मर्सिडीज कारने 4 वर्षीय मुलीला धडक

point

मर्सिडीज कारने 4 वर्षीय चिमुकलीला उडवलं, हवेत फेकल्या गेली अन्..

Pune Accident : शिरूर तालुक्यातील बोऱ्हाडेमळा परिसरात पुणे–अहिल्यानगर महामार्गावर सोमवारी दुपारी एक धक्कादायक अपघात झालाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूर-हवेली मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या भरधाव मर्सिडीज कारने चार वर्षीय बालिकेला जोरदार धडक दिली. या घटनेचा स्पष्ट सीसीटीव्ही फुटेजही समोर आला असून स्थानिकांमध्ये गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

अपघातात जखमी झालेल्या बालिकेचं नाव शुभ्रा पंढरीनाथ बोऱ्हाडे (वय 4) असं असून ती रस्ता ओलांडत असताना ही घटना घडली. आमदार कटके यांच्या काळ्या रंगाच्या मर्सिडीज (MH 12 1391) वाहनाने वाघोलीहून शिरूरकडे प्रचारासाठी येत असताना बालिकेला धडक दिल्याची माहिती आहे. धडकेची तीव्रता इतकी होती की शुभ्रा काही अंतरावर फेकली गेल्याचे फुटेजमध्ये दिसून आले.

घटनेनंतर परिसरातील नागरिक तात्काळ मदतीला धावून आले. त्यांनी जखमी बालिकेला त्वरित शिरूरच्या वात्सल्य हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारांसाठी तिला पुण्यातील केएम हॉस्पिटल येथे हलवण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे बालिकेचा जीव वाचल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

हेही वाचा : 'मंत्रिमंडळात आता जागाच...', जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य, चर्चेला पूर्णविराम

हे वाचलं का?

    follow whatsapp