अनगर नगरपंचायतीची निवडणूक स्थगित; आता राजन पाटलांच्या सूनबाई बिनविरोध नगराध्यक्षा होणार का?
Angar Nagar Panchayat elections : अनगर नगरपंचायतीची निवडणूक स्थगित; आता राजन पाटलांच्या सूनबाई बिनविरोध नगराध्यक्षा होणार का?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अनगर नगरपंचायतीची निवडणूक स्थगित
आता राजन पाटलांच्या सूनबाई बिनविरोध नगराध्यक्षा होणार का?
Angar Nagar Panchayat elections : अनगर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाची निवडणूक अचानक स्थगित करण्यात आली असून, आता राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार पुढील प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबतचा अधिकृत आदेश काढला आहे. महाराष्ट्र नगरपालिका नियम 1966 मधील संबंधित तरतुदीनुसार काही ठिकाणी आवश्यक ती निवडणूकपूर्व कार्यवाही वेळेत पूर्ण न झाल्याचे समोर आल्यानंतर आयोगाने हा निर्णय घेतला.
अनगरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काही नगरपरिषदांमध्ये दाखल अपीलांवर न्यायालयांनी 23 नोव्हेंबरपर्यंत निकाल दिल्यामुळे तिथे प्रक्रिया सुरळीतपणे पुढे गेली. मात्र अनगरचा निकाल 25 नोव्हेंबर रोजी लागल्याने तांत्रिक कारणास्तव प्रक्रिया नव्याने राबवावी लागणार असल्याचे सांगण्यात आले. सुधारित कार्यक्रम लागू झाल्यानंतर अनगरमध्ये प्रत्येक पदासाठी केवळ एकच वैध उमेदवारी अर्ज असल्याची माहिती आयोगाकडे पाठविली जाणार आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोग बिनविरोध निवड झाल्याची औपचारिक घोषणा करू शकतो.
या संपूर्ण घडामोडीवर प्रतिक्रिया देताना सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, “अनगरची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. कोणत्या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे, हा न्यायालयाचा विषय आहे. आम्ही आदेशाचा अभ्यास करून न्यायालयात आमची भूमिका मांडणार आहोत. अद्याप मला आदेश पाहायला मिळालेला नाही.”










