आईचे अनैतिक संबंध, मुलाने प्रियकरासोबत रंगेहात पकडलं, दोघांचा जागेवर संपवून पिकअपमध्ये टाकलं अन्..

मुंबई तक

Crime News : आईचे अनैतिक संबंध, मुलाने प्रियकरासोबत रंगेहात पकडलं, दोघांचा जागेवर संपवून पिकअपमध्ये टाकलं अन्..

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आईचे अनैतिक संबंध, मुलाने प्रियकरासोबत रंगेहात पकडलं

point

दोघांचा जागेवर संपवून पिकअपमध्ये टाकलं अन्..

Crime News : सिरसा जिल्ह्यातील सिकंदरपूर थेडी गावात अवैध संबंधाच्या वादातून घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. अवघ्या काही तासांत आई आणि तिच्या कथित प्रियकराचा जीव घेऊन आरोपी मुलाने स्वतः पोलिस ठाण्यात येऊन सरेंडर केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही धक्कादायक घटना गुरुवारी उशिरा रात्री घडली.

अधिकची माहिती अशी की, आरोपी युवकाने आपल्या आई अंगुरी देवी (वय सुमारे 50) आणि तिच्या कथित प्रेमी लेखचंद (वय 50) यांचा गळा आवळून खून केला. रात्री दोनच्या सुमारास दोघांना ठार केल्यानंतर आरोपीने शुक्रवारी सकाळी दोन्ही मृतदेह पिकअप वाहनात ठेवले आणि थेट सिरसा सदर पोलिस ठाण्यात पोहोचला. तेथे पोलिसांसमोर हजर होत त्याने संपूर्ण घटना सांगितली.

हेही वाचा : नाशिक : भावपूर्ण श्रद्धांजलीचं स्टेटस, पत्नीसह दोन मुलांचा खून केला अन् स्वत:ही गळफास घेऊन केली आत्महत्या

पोलिसांनी तत्काळ दोन्ही मृतदेह जप्त करून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. प्राथमिक चौकशीत आरोपीने आई आणि लेखचंद यांच्यातील अवैध संबंधांमुळेच हा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगितले. तसेच या हत्याकांडात त्याच्या पत्‍नीचाही सहभाग असल्याची माहिती पोलिसांना दिली.

हे वाचलं का?

    follow whatsapp