अपघाती मृत्यू समजून अंत्यसंस्कार, पण कुटुंबियांचा पत्नीवर संशय! अखेर, पुरलेल्या मृतदेहाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट्सवरून उलगडा...
पीडित व्यक्तीच्या मृत्यूला त्याच्या कुटुंबियांनी साधा अपघात समजून अंत्यसंस्कार करुन टाकले. परंतु त्याच्या पत्नीच्या विचित्र वागण्याने हळूहळू त्याच्या मृत्यूमागचं गूढ उलगडत गेलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अपघाती मृत्यू समजून केले अंत्यसंस्कार
पण कुटुंबियांचा पत्नीवर हत्येचा संशय!
अखेर, पुरलेल्या मृतदेहाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट्सवरून उलगडा...
Crime News: गुजरातमधील वडोदरा येथे एका 32 वर्षीय व्यक्तीची निर्दयी हत्या करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं. खरं कर, सुरुवातीला पीडित व्यक्तीच्या मृत्यूला त्याच्या कुटुंबियांनी साधा अपघात समजून अंत्यसंस्कार करुन टाकले. परंतु त्याच्या पत्नीच्या विचित्र वागण्याने हळूहळू त्याच्या मृत्यूमागचं गूढ उलगडत गेलं. हा एक अपघात नसून गळा दाबून केलेली हत्या असल्याचं समोर आलं. नेमकं काय घडलं?
मृताच्या पत्नीवर संशय
18 नोव्हेंबर रोजी इरशाद अब्दुल करीम बंजारा नावाच्या एका तरुणाचा संशयास्पद पद्धतीने मृत्यू झाला. सुरुवातीला कुटुंबियांना तो एक अपघाती मृत्यू वाटला आणि त्यामुळे कोणताही संशय न घेता, दुसऱ्याच दिवशी कुटुंबियांकडून त्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले. खरं तर, त्यावेळी, कोणीही कल्पना अशी केली नव्हती की हे प्रकरण इतकं गंभीर असू शकतं. परंतु पतीच्या मृत्यूनंतर, कुटुंबियांना इरशादच्या पत्नीच्या वागण्याचं आश्चर्य वाटू लागलं. पतीच्या अचानक मृत्यूनंतर पत्नी शोकात असणं अपेक्षित असतं. मात्र, कुटुंबियांच्या मते इरशादची पत्नी तितकी दुःखी दिसत नव्हती. तिच्या या वागण्यामुळे कुटुंबियांचा इरशादच्या पत्नीवर आणखी संशय वाढत गेला.
हे ही वाचा: कोल्हापूरच्या पुरुषावर पुण्यात अत्याचार, महिलेने गुंगीचं औषध देऊन डाव साधला अन्...
पत्नीने प्रियकरासोबत पतीची हत्या केल्याची शंका
पीडित तरुणाची कट रचून हत्या करण्यात आल्याचा संशय निर्माण झाला. दरम्यान, इरशादच्या पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध असल्याचं उघडकीस आलं. त्यानंतर, हा संशय अधिकच बळावत गेला. इरशादची हत्या त्याच्या पत्नीने तिचा प्रियकर आणि मित्रांसोबत कट रचून केल्याचा कुटुंबियांना शंका आली. त्यांनंतर, कुटुंबियांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आणि इरशादच्या पत्नीवर हत्येचा आरोप असल्याचा संशय व्यक्त केला. या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावेळी, इरशादचा पुरलेला मृतदेह दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बाहेर काढण्यात आला आणि त्यानंतर मृत्यूमागचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी त्याला पोस्टमॉर्टमसाठी गोत्री रुग्णालयात पाठवण्यात आला.
हे ही वाचा: छतावर उभी राहून लग्नाची वरात पाहत होती पण, अचानक गोळीबार सुरू झाला अन्... तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सत्य उघडकीस
पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून प्रकरणातील सत्य उघडकीस आलं. डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं की इर्शादचा मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती नव्हता तर, त्याचा गळा दाबून खून करण्यात आला होता. म्हणजेच ही एक सुनियोजित हत्या होती. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्ट्सनंतर, पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली आणि मृताची पत्नी, तिचा प्रियकर आणि प्रियकराच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला. आता, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.










