छतावर उभी राहून लग्नाची वरात पाहत होती पण, अचानक गोळीबार सुरू झाला अन्... तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
19 वर्षीय तरुणी आपल्या घराच्या छतावरून लग्नाची वरात पाहत असताना तिच्यासोबत एक भयंकर घटना घडली. अक्सा नावाची पीडित तरुणी खाली रस्त्यावरून जात असलेली लग्नाची वरात पाहत होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
छतावर उभी राहून लग्नाची वरात पाहत होती पण...
लग्नाच्या वरातीत अचानक गोळीबार सुरू झाला अन्...
गोळीबारात तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
Crime News: उत्तर प्रदेशातील मेरठ येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक 19 वर्षीय तरुणी आपल्या घराच्या छतावरून लग्नाची वरात पाहत असताना तिच्यासोबत एक भयंकर घटना घडली. अक्सा नावाची पीडित तरुणी खाली रस्त्यावरून जात असलेली लग्नाची वरात पाहत होती. मात्र, सगळीकडे उत्साहाचं वातावरण असताना अचानक एका भयानक घटनेत पीडितेला आपला जीव गमवावा लागला. आता, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. नेमकं काय घडलं?
छतावर उभ्या असलेल्या तरुणीला गोळी लागली अन्...
मेरठच्या सिलाडी गेट परिसरात राहणाऱ्या सुहेल नावाच्या एका तरुणाचं लग्न होतं. हापूड रोडवरील एका मंडपाकडे त्याच्या लग्नाची वरात जात होती. लग्नाची वरात तरुणीच्या घराजवळून जात असताना अक्सा तिच्या घराच्या छतावरून सुहेलच्या लग्नाची वरात पाहत होती. मात्र, अचानक गोळीबार सुरू झाला आणि छतावर उभ्या असलेल्या अक्साला गोळी लागली. त्यावेळी तिचा जागीच मृत्यू झाला. अक्साच्या कुटुंबियांनी तिला तातडीने रुग्णालयात नेलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या गोळीबारात पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबईकरांची मान अभिमानाने उंचावली! छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाने करून दाखवलं...
नवरदेवाच्या भावाने केला गोळीबार
मिळालेल्या माहितीनुसार, सुहेलच्या लग्नाच्या वरातीत असलेल्या बऱ्याच लोकांच्या हातात हत्यारे होती. सुहेलची वरात निघताच लोकांनी आनंदात फायरिंग सुरू केलं आणि निष्पाप अक्साला यामुळे जीव गमवावा लागला. मुलीच्या मृत्यूमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. अक्साच्या पोटात गोळी लागली आणि त्यामुळे तिचा एका क्षणात मृत्यू झाला. अक्साचा मृत्यू नवरदेवाचा भाऊ साकिबने चालवलेल्या गोळीमुळे झाल्याचं पोलिसांच्या तपासात उघडकीस आलं. साकिबने केलेल्या गोळीबारामुळे छतावर उभ्या असलेल्या अक्साच्या पोटात गोळी लागली.
हे ही वाचा: कोल्हापूरच्या पुरुषावर पुण्यात अत्याचार, महिलेने गुंगीचं औषध देऊन डाव साधला अन्...
पोलिसांची करवाई
संबंधित घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहताच सुहेल आणि त्याचे कुटुंबीय पळून गेले आणि लग्न झालं नाही. अद्याप, पोलिसांनी सुहेलचा भाऊ साकिब आणि त्याच्या आईला अटक करून तुरुंगात पाठवलं आहे. दरम्यान, वर आणि त्याचे वडील फरार असल्याचं वृत्त आहे. पोलिसांनी लग्नाच्या मिरवणुकीत सहभागी असलेल्या अनेक लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून त्यांची ओळख पटवली जात आहे.










