दुकानदाराकडे नाश्ता केला, पैशांची मागणी केल्यास चाकूने केले सपासप वार, धक्कादायक कांड
crime news : एका दुकानदाराने नाश्ता आणि मिठाईचे पैसे मागितल्यानंतर त्याच्यावर चाकूने सपासप वार करत संपवलं. या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. दुकानदाच्या पाठीवर आणि मानेवर अशा संवेदनशील भागात वार केल्याची हादरवून टाकणारी घटना आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नेमकं काय घडलं?
दुकानदार आणि गिऱ्हाईकांमध्ये वाद
crime news : बिहारमधील पटणाच्या धनरुआ पोलीस ठाणे परिसरात साई बाजारात एका दुकानदाराने नाश्ता आणि मिठाईचे पैसे मागितल्यानंतर त्याच्यावर चाकूने सपासप वार करत संपवलं. या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. दुकानदाच्या पाठीवर आणि मानेवर अशा संवेदनशील भागात वार केल्याची हादरवून टाकणारी घटना आहे.
हे ही वाचा : शनि आणि चंद्राचे विषारी संयोजन, काही राशीतील लोकांना अडचणीचा सामना करावा लागणार
नेमकं काय घडलं?
या प्रकरणात प्राथमिक उपचारानंतर त्याला पीएमसीएचमध्ये रेफर करण्यात आले होते. तेव्हा त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत होतं. या प्रकरणात कुटुंबाने चार दुचाकीस्वार गुन्हेगारांना जबाबदार धरले आहे. याच दरम्यान, संतप्त झालेल्या दुकानदारांनी सोमवारी दिवसभर आपली दुकाने बंद ठेवली. पोलिसांनी आरोपींना तत्काळपणे अटक करण्याची मागणी केली.
दुकानदार आणि गिऱ्हाईकांमध्ये वाद
साई गावातील रहिवासी असलेल्या चंद्रशेखर प्रसाद यांचा 48 वर्षीय मुलगा सुरेंद्र कुमार हा नेहमीप्रमाणात दुकानात बसला होता. रविवारी सायंकाळी उशिरा दुचाकीवरून चार तरुण दुकानात पोहोचले आणि नाश्ता झाल्यानंतर दुकानदारांना पैसे देण्यास त्यांनी विरोध केला होता. त्यानंतर दोघांमध्ये मोठा वाद उफळला होता. तेव्हा एका तरुणाने सुरेंद्रच्या मानेवर चाकूने वार केले. पळून जाताना, हल्लेखोरांनी सुरेंद्रच्या पाठीतच सपासप वार केले आणि त्यांनी दुचाकीवरून घटनास्थळावरून पळ काढला.
हे ही वाचा : चंद्रपूर : शिक्षकाचे विद्यार्थीनीला बाथरुममध्ये विवस्त्र होऊन व्हिडीओ कॉल, स्क्रीनशॉट मुलीच्या वडिलांना दिसले अन्..










