मुंबईची खबर: मुंबईकरांची मान अभिमानाने उंचावली! छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाने करून दाखवलं...

मुंबई तक

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने जगातील सर्वात व्यस्त सिंगल-रनवे विमानतळाचा रेकॉर्ड मोडून एक नवा विक्रम बनवला आहे.

ADVERTISEMENT

जगातील सर्वात व्यस्त सिंगल-रनवे विमानतळ...
जगातील सर्वात व्यस्त सिंगल-रनवे विमानतळ...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई विमानतळाचा नवा विक्रम!

point

जगातील सर्वात व्यस्त सिंगल-रनवे विमानतळ...

Mumbai News: मुंबई विमानतळाने 21 नोव्हेंबर रोजी विमानांच्या उड्डाणाचा एक नवा विक्रम बनवला आहे. या एअरपोर्टवरून 24 तासांत तब्बल 1036 उड्डाणे झाली. यासोबतच, या उड्डणांसह मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने जगातील सर्वात व्यस्त सिंगल-रनवे विमानतळाचा रेकॉर्ड मोडून एक नवा विक्रम बनवला आहे. या एअरपोर्टचा मागील रेकॉर्ड म्हणजेच 11 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबई विमानतळावरून 1,032 उड्डाणे झाली होती. 

'इतक्या' प्रवाशांनी केला प्रवास

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील व्यावसायिक कामकाज सुरू होण्याच्या काही आठवड्यांपूर्वीच मुंबई एअरपोर्टचा हा नवा रेकॉर्ड बनला आहे. यामुळे कालांतराने वाहतूकीतील वाढीचे हळूहळू पुनर्वितरण होण्याची अपेक्षा आहे. CSMIA कडून 21 नोव्हेंबर 2025 रोजी 170,488 प्रवाशांची नोंद केली. त्यापैकी 1,21,527 प्रवाशांनी देशांतर्गत उड्डाणांनी प्रवास केला असून 48,961 प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सने प्रवास केला. 

या विमानतळावर दिवसभरात 86,443 आगमन आणि 84,045 निर्गमन झाले. विमानतळावरून 1,036 एटीएम हाताळले गेले असून त्यात 755 देशांतर्गत उड्डाणे आणि 281 आंतरराष्ट्रीय उड्डाणे समाविष्ट होती. अशाप्रकारे, अंदाजे 520 आगमन आणि 516 विमाने बाहेर पडली. 

हे ही वाचा: Govt Job: 'या' सरकारी इन्शुरन्स कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी! काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?

मुंबई विमानतळाचं वैशिष्ट्य 

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारताच्या मुख्य व्यावसायिक सेंटरच्या मध्यभागी स्थित आहे. ते जागतिक प्रवाशांसाठी एक मुख्य प्रवेशद्वार म्हणून महत्त्वाची भूमिका साकारत आहे. एअर इंडिया (AI), विस्तारा (UK) आणि इंडिगो (6E) या विमानतळाद्वारे विस्तृत नेटवर्क चालवतात. मुंबईत पहिल्यांदाच येणारे पर्यटक बऱ्याचदा इथूनच भारताचा प्रवास सुरू करतात. 

हे वाचलं का?

    follow whatsapp