बीडमधील भाईगिरीचं फॅड कमी होईना, शाळेसमोरच टोळक्याची विद्यार्थ्याला बेदम मारहाण
Beed Crime : बीडमधील भाईगिरीचं फॅड कमी होईना, शाळेसमोरच टोळक्याची विद्यार्थ्याला बेदम मारहाण
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बीडमधील भाईगिरीचं फॅड कमी होईना
शाळेसमोरच टोळक्याची विद्यार्थ्याला बेदम मारहाण
Beed Crime : बीड जिल्ह्यातील मारहाणीच्या घटनांना कधी ब्रेक लागणार? असा प्रश्न विचारण्याची वेळ आलीये. कारण बीडमध्ये मारहाणीच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीतेय. शिरूर कासार तालुक्यातील रायमोह येथे रविवारी घडलेल्या धक्कादायक घटनेने जिल्ह्यातील ‘भाईगिरी’चे वाढते फॅड स्पष्टपणे दिसून येत आहे. शहरातील अपंग मतिमंद विद्यालयाच्या गेटबाहेर एका विद्यार्थ्याला पाच ते सहा विद्यार्थ्यांच्या टोळक्याने घेरून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
ही मारहाण दोन दिवसांपूर्वी घडल्याचे प्राथमिक माहितीतून स्पष्ट झाले असून, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आरोपी विद्यार्थी पीडित विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, शाळेच्या गेटबाहेरच अशा प्रकारचे हल्ले होत असल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
या घटनेत सहभागी विद्यार्थी हे जालंदर विद्यालय, रायमोह येथील असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप उघड झालेलं नाही. सर्वात गंभीर बाब म्हणजे या प्रकरणी अद्याप शिरूर कासार पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार वा गुन्हा दाखल केलेला नाही. सतत घडणाऱ्या मारहाणीच्या घटनांमुळे प्रशासन आणि पोलिसांची धाकदपटशाही कमी झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.










