IIT च्या नावातील बॉम्बे तसंच ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं; केंद्रीय मंत्र्यांचं वक्तव्य; राज ठाकरे संतापले
Raj Thackeray on Minister Jitendra Singh : IIT च्या नावातील बॉम्बे तसंच ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं; केंद्रीय मंत्र्यांचं वक्तव्य; राज ठाकरे संतापले
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
"IIT च्या नावातील बॉम्बे तसंच ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं"
केंद्रीय मंत्र्यांचं वक्तव्य; राज ठाकरे संतापले
Raj Thackeray on Minister Jitendra Singh, Mumbai : केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सोमवारी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाची चिन्हे दिसू लागली आहेत. “आयआयटी बॉम्बेच्या नावातील ‘बॉम्बे’ हेच तसे कायम ठेवण्यात आले, ते ‘मुंबई’ करण्यात आले नाही, हे योग्यच झाले,” असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चा रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आयआयटी मुंबईच्या पी. सी. सक्सेना सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी त्यांनी क्वांटम तंत्रज्ञान, वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे झालेले बदल, संशोधनाच्या नव्या वाटा आदी विषयांवर भाष्य केले. याच दरम्यान त्यांनी आयआयटी मुंबईच्या नावाबाबत समाधान व्यक्त केले. दरम्यान, जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केलाय. त्यांनी X आणि फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत केंद्रीय मंत्र्यांवर टीका केली आहे.
राज ठाकरे यांची पोस्ट जशीच्या तशी
केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी मुंबईत आयआयटीच्या कार्यक्रमात बोलताना, 'आयआयटीच्या नावातील बॉंबे तसंच ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं असं विधान केलं'. जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय. आणि ही मानसिकता काय आहे ? तर मुंबई जी मराठी माणसाची होतीच , तिला महाराष्ट्रापासून पासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला. आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे !
हेही वाचा : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं काय होणार? सर्वोच्च न्यायालयात आज नेमकं काय घडलं?
खरंतर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी, ना गुजरातशी. ते येतात जम्मूमधून.. पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललं आहे ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणे हाच त्यांचा उद्देश आहे.










