Govt Job: 'या' सरकारी इन्शुरन्स कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी! काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?

मुंबई तक

ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (OICL) या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीकडून अॅडमिनिस्ट्रॅटिव्ह ऑफिसर म्हणजेच प्रशासकीय अधिकारी (AO) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

इन्शुरन्स कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी!
इन्शुरन्स कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'या' सरकारी इन्शुरन्स कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी!

point

काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?

OICL Recruitment 2025: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ऑफिसर पदांवरील नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (OICL) या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीकडून अॅडमिनिस्ट्रॅटिव्ह ऑफिसर म्हणजेच प्रशासकीय अधिकारी (AO) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीचं शॉर्ट नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं असून यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 1 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार orientalinsurance.org.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन 15 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. 

'या' पदांसाठी भरती

  1. एओ (अॅडमिनिस्ट्रॅटिव्ह ऑफिसर) जर्नालिस्ट: 285
  2. हिंदी ऑफिसर: 15 

अशा एकूण 300 पदांसाठी भरती केली जाणार आहे. 

हे ही वाचा: ठाणे: सूटकेसमध्ये सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली! लिव्ह-इन-पार्टनरनेच केली हत्या... आरोपीला अटक

काय आहे पात्रता? 

या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापिठातून ग्रॅज्युएशनची डिग्री असणं आवश्यक आहे. तसेच, हिंदी ऑफिसर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे हिंदीमध्ये पदव्युत्तर (ग्रॅज्युएशन) पदवी किंवा इंग्रजीसह हिंदी हा विषय घेऊन पदवी असणं अनिवार्य आहे. 

हे ही वाचा: गावात दिपांशूच्या मृत्यूची अफवा... नंतर, प्रेयसीने गळफास घेत संपवलं आयुष्य! प्रेमकहाणीचा 'असा' झाला शेवट

  • वयोमर्यादा: 21 ते 30 वर्षे 

कसा कराल अर्ज?

1. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम orientalinsurance.org.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
2. आता बेसिक माहिती भरून रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करा. 
3. नंतर, रजिस्ट्रेशन नंबरच्या साहाय्याने वेबसाइटवर लॉगिन करा. 
4. त्यानंतर, आवश्यक माहिती भरून फॉर्म कम्प्लिट करा. 
5. फॉर्म भरल्यानंतर लेटेस्ट फोटो, सही योग्य साइजमध्ये अपलोड करा. 
6. शेवटी, अर्ज सबमिट करा आणि फॉर्मची प्रिंटआउट काढून सुरक्षितरित्या ठेवा. 

हे वाचलं का?

    follow whatsapp