नवऱ्याची हत्या करून ड्रममध्ये टाकणारी बायको मुस्कान झाली आई, मुलीला दिला जन्म, रुग्णालयात सुरक्षारक्षक तैनात
Crime news : मेरठमध्ये सौरभ हत्याकांडातील मुख्य आरोपी आणि सौरभची पत्नी मुस्कानने सोमवारी मेरठ मेडिकल कॉलेज रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला आहे. रविवारी रात्री मुस्कानला रुग्णालयात पाठवण्यात आले होते. तेव्हा सायंकाळी 6 ते 7 वाजण्याच्या दरम्यान, तिनं बाळाला जन्म दिला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुस्कानने दिला बाळाला जन्म
बाळाच्या डीएनए चाचणी करण्याची मागणी
Crime news : उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये सौरभ हत्याकांडातील मुख्य आरोपी आणि सौरभची पत्नी मुस्कानने सोमवारी मेरठ मेडिकल कॉलेज रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला आहे. रविवारी रात्री मुस्कानला रुग्णालयात पाठवण्यात आले होते. तेव्हा सायंकाळी 6 ते 7 वाजण्याच्या दरम्यान, तिनं बाळाला जन्म दिला. रुग्णालयात कडक सुरक्षा यंत्रणा ठेवण्यात आली होती. तेव्हा प्रसूती सुरु असताना सुरक्षेसाठी आठ सदस्यीय पोलीस पथकाने परिस्थितीवर लक्ष ठेवत नवजात बाळ आणि मुस्कान हे दोघेही रुग्णालयात आहेत आणि पोलीस संरक्षण सुरु असल्याची माहिती समोर आली.
हे ही वाचा : अमेरिकन व्हिसा नाकारल्याने महिला डॉक्टरनं घरातच उचललं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक कारण
बाळाच्या डीएनए चाचणी करण्याची मागणी
अशातच आता सौरभच्या कुटुंबीयांनी बाळाच्या डीएनए चाचणी करण्याची मागणी केली आहे. सौरभचा भाऊ बबलू राजपूत म्हणाला की बाळ सौरभचे असल्याचे निष्पन्न झाले तर ते तिला ठेवतील, यासाठी मुस्कानच सर्वस्वी जबाबदार ठरेल. अशातच डॉक्टरांनी बाळाचा जन्म हा चार दिवसानंतर होईल असे भाकीत केले होते, परंतु मुस्कानची दिलेल्या वेळेपूर्वीच प्रसूती झाली आणि बाळाला जन्म दिला.
तुरुंगाचे वरिष्ठ अधीक्षक डॉ. वीरिश राज शर्माने सांगितलं की, मुस्कान ही मार्च महिन्यात जेलमध्ये होती आणि तेव्हाच ती गरोदर होती. तेव्हा तिची परिस्थिती पाहून तिच्यावरील वैद्यकीय उपचार आणि योग्य आहार दिला होता. असे बहुतेक गरोदर तुरुंगातील महिलांसाठी ती नियमावली आहे.
हे ही वाचा : दुकानदाराकडे नाश्ता केला, पैशांची मागणी केल्यास चाकूने केले सपासप वार, धक्कादायक कांड
दरम्यान, आता तुरुंगातील अधिक्षकांनी सांगितले की, मुलीने वजन हे अंदाजे 2.4 किलो आहे. तसेच आई आणि बाळ दोघेही निरोगी आहेत. सहा वर्षांपर्यंतची मुले त्यांच्या आई किंवा आजीसोबत महिला बॅरेकमध्ये राहू शकतात. मुलांसाठी शिक्षण आणि इतर सुविधा पुरवल्या जात आहेत. तसेच तुरुंगातील अटक असलेल्या गर्भवती महिलांची काळजी घेतली आणि आरोग्य विभागाचे डॉक्टर नियमित चाचणी आणि लसीकरण करतील. मुस्कानने तिच्या पालकांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु तुरुंगाच्या नियमांमुळे ते शक्य झालेलं नाही. सध्या मुलगी आणि मुस्कान रुग्णालयातच आहे आणि लवकरच तुरुंगात परतेल.










