विवाहित महिलेचे दोन पुरुषांसोबत अनैतिक संबंध! अचानक भलत्याच तरुणाची एन्ट्री अन् रचला भयानक कट...

मुंबई तक

प्रेमसंबंधात अचानक भलत्याच तरुणाची एन्ट्री झाल्याने तिचे दोन्ही प्रियकर महिलेवर संतापले आणि त्यानंतर, एक धक्कादायक घटना घडली.

ADVERTISEMENT

भलत्याच तरुणाची एन्ट्री अन् रचला भयानक कट...
भलत्याच तरुणाची एन्ट्री अन् रचला भयानक कट...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विवाहित महिलेचे दोन पुरुषांसोबत अनैतिक संबंध!

point

अचानक भलत्याच तरुणाची एन्ट्री अन् रचला भयानक कट...

Crime News: एका महिलेचे दोन पुरुषांसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, काही काळानंतर त्या महिलेची एका दुसऱ्याच तरुणाशी मैत्री झाली. याच गोष्टीमुळे बंटी आणि राकेश नावाचे तिचे दोन्ही प्रियकर महिलेवर संतापले आणि त्यानंतर, एक धक्कादायक घटना घडली. संबंधित प्रकरण हे दिल्लीच्या नोएडा येथील असल्याची माहिती आहे. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या. 

संबंधित महिला ही मूळ जहांगीरपुरची रहिवासी होती. तिचा नवरा त्यांच्या मुलांसोबत हरियाणामध्ये राहत असून ती महिला एकटीच राहून आपलं गावातील घर सांभाळत होती. त्या महिलेची आधीच राकेश आणि बंटी नावाच्या तरुणांशी मैत्री होती. तिघांचेही कुटुंब एकमेकांच्या शेजारीच असल्याने दोघांचं महिलेच्या घरी सतत येणं-जाणं असायचं. 

प्रेमसंबंधात भलत्याच तरुणाची एन्ट्री

मात्र, तिघांच्याही आयुष्यात अचानक वेगळं वळण आलं. जवळपास चार ते पाच वर्षांपूर्वी, राकेशची पत्नी त्याला सोडून गेली. त्यानंतर, सुमारे सहा महिन्यांपूर्वी, बंटीचा तिच्या पत्नीशी सतत वाद होत असल्याकारणाने त्याची पत्नीसुद्धा त्याला सोडून दिल्लीला गेली. पत्नी सोडून गेल्यानंतर, दोन्ही तरुण त्या महिलेच्या जवळ गेले आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, या काळात एक भलताच तरुण तिच्या संपर्कात आला आणि प्रेमसंबंधात गोंधळ उडाला. प्रेमसंबंधात तिसऱ्याच्या एन्ट्रीमुळे बंटी आणि राकेश खूप अस्वस्थ झाले आणि त्यांना महिलेवर संशय येऊ लागला. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: एल्फिन्स्टन पूलाच्या पाडकामासाठी सेंट्रल रेल्वेची 'इतक्या' कोटी रुपयांची मागणी...

स्कार्फने गळा आवळून हत्या 

त्यानंतर, बंटी आणि राकेश दोघांनी मिळून महिलेला संपवण्याचा कट रचला. त्यांच्या प्लॅनिंगनुसार, ते 18 नोव्हेंबरच्या रात्री तिच्या घरी गेले. तिथे दोघांनीही महिलेचा स्कार्फने गळा आवळून तिची हत्या केली. हत्येनंतर, कोणालाही त्यांच्यावर संशय येऊ नये म्हणून त्यांनी तिचा मृतदेह एका मोडकळीस आलेल्या घरात टाकला.

हे वाचलं का?

    follow whatsapp