एका तासात तीन जणांचा निर्घृण खून! पॅरोलवर सुटला अन् शहरातून फरार... अखेर 'हा' भयानक गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात
एका तासात तीन जणांची निर्घृण हत्या करणाऱ्या एका भयानक गुन्हेगाराची कहाणी ऐकून तुम्ही चक्रावून जाल.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
एका तासात तीन जणांचा निर्घृण खून!
आरोपी पॅरोलवर सुटला अन् शहरातून फरार...
अखेर 'हा' भयानक गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात
Crime News: एका तासात तीन जणांची निर्घृण हत्या करणाऱ्या एका भयानक गुन्हेगाराची कहाणी ऐकून तुम्ही चक्रावून जाल. गुन्हेगाराला पोलिसांनी खूप प्रयत्नांनंतर अटक केली आणि त्याची तुरुंगात रवानगी केली. मात्र, तुरुंगातून पॅरोलवर सुटल्यानंतर तो कैदी गायब झाला. या भयानक गुन्हेगाराचं नाव आहे सोहराब.
खरं तर, सोहराब हा एका अत्यंत संघटित आणि धोकादायक टोळीचा भाग होता. ही टोळी तो त्याचे भाऊ सलीम आणि रुस्तम यांच्यासोबत चालवत होता. हे तिघेही भाऊ खून, दरोडा आणि चोरी यासारख्या अनेक गंभीर प्रकरणांमध्ये वॉन्टेड राहिले आहेत. शहरात दहशत पसरवणे हेच तिघांचं ध्येय असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं.
पोलीस अधिकाऱ्यांना उघड आव्हान
सोहराबच्या सर्वात चर्चित गुन्ह्यांपैकी एक म्हणजे त्याने ईदच्या दिवशी एका तासाच्या आत तीन लोकांची हत्या केली. तसेच, या घटनेनंतर, त्याने लखनऊच्या तत्कालीन एसएसपींना फोन करून उघड आव्हान दिले. तो म्हणाला की "तुमच्यात हिंमत असेल तर मला पकडा." त्याच्या या गुन्ह्याने पोलिसांना देखील हादरवून टाकलं आणि त्यानंतर एक पोलिसांची मोठी कारवाई सुरू करण्यात आली. अखेर, पोलिसांनी त्याला अटक केली.
हे ही वाचा: इन्स्पेक्टरसोबत महिलेचे अनैतिक संबंध! गाडीत शक्तीवर्धक गोळ्या घेतल्या अन्... शेवटी, शेतात नग्न अवस्थेत आढळला पीडितेचा मृतदेह
सोहराबचा गुन्हेगारी रेकॉर्ड
2011 मध्ये, करोल बाग येथील एका दागिन्यांच्या दुकानात दरोडा आणि खून झाल्याने शहर हादरून गेलं होतं. या घटनेत सोहराब आणि त्याच्या एका भावाचा समावेश होता. नंतर, न्यायालयाने दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तेव्हापासून, सोहराब तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. जून 2024 मध्ये, त्याला काही दिवसांसाठी पॅरोल मिळाला होता, परंतु तेव्हापासून तो तुरुंगात परतला नाही. त्या शहरातून तो फरार झाला. त्याने त्याची ओळख बदलली आणि कोलकातामध्ये कॅब चालक म्हणून काम करण्यास सुरूवात केली. पोलीस बऱ्याच महिन्यांपासून त्याचा शोध घेत होते. अखेर, पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली.










