तू काळा अन् तुझं पोरगं गोरं कसं? मित्रांच्या टोमण्याने तळपायाची आग मस्तकात, थेट सासरवाडीत गेला अन्...

मुंबई तक

Crime News : तू काळा अन् तुझं पोरगं गोरं कसं? मित्रांच्या टोमण्याने तळपायाची आग मस्तकात, थेट सासरवाडीत गेला अन्...

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तू काळा अन् तुझं पोरगं गोरं कसं?

point

मित्रांच्या टोमण्याने तळपायाची आग मस्तकात, थेट सासरवाडीत गेला अन्...

Crime News :  बिहारमधील कटिहार जिल्ह्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. मित्रांच्या चिडवाचिडवीपासून सुरू झालेलं भांडण पत्नीच्या निर्घृण खुनापर्यंत पोहोचल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. एका पतीला आपल्या पत्नीविषयी संशय निर्माण झाला आणि तो संशय इतका वाढत गेला की त्याने रागाच्या भरात सासरवाडीत जाऊन स्वतःच्या पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

“तू एवढा काळा, मग तुझा मुलगा इतका गोरा कसा काय?”

जलकी (आझमनगर) गावातील सुकुमार दास आणि पत्नी मौसमी दास यांना काही महिन्यांपूर्वी दुसरे अपत्य झाले. पहिला मुलगा वडिलांच्या वर्णाचा काळा-सावळा होता, परंतु नुकताच जन्मलेला दुसरा मुलगा गोरा असल्याने सुकुमारच्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागली. त्यातच त्याच्या मित्रांनी, ओळखीच्या लोकांनी सतत टोमणे मारणे सुरू केले. “तू एवढा काळा, मग तुझा मुलगा इतका गोरा कसा काय?” अशा टिप्पणींनी त्याच्या मनातील शंका आणखी बळावली.

घरातील छोट्यामोठ्या भांडणांचे रूपांतर काही दिवसांत मोठ्या वादात झाले. सुकुमार पत्नीला सतत मुलाच्या पित्याबद्दल चौकशी करू लागला. मौसमीने त्याला वारंवार सांगितले की मुलगा त्याचाच आहे, मात्र सुकुमारचे संशयाचे ढग काही हटत नव्हते. अखेर या सततच्या त्रासामुळे मौसमीने वडिलांना बोलावले आणि ती माहेरी माघारी निघून गेली.

पत्नीला वार करुन संपवलं 

तीन महिन्यांहून अधिक काळ दोघांमध्ये तणाव कायम होता. सासऱ्यानेही जावयाला समजावण्याचा, गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला, परंतु सुकुमारच्या मनातील संशय आणखी गडद होत गेला. या तणावाच्या वातावरणात एके रात्री सगळे जण जेवण करून झोपले. मात्र उशिरा सुकुमारने पत्नीला समजावण्याऐवजी अतिउत्साह, राग आणि चुकीच्या संशयाच्या भरात भीषण पाऊल उचलले.

हे वाचलं का?

    follow whatsapp