सहा मुलं झाली, सुखाचा संसार सुरु असताना दुसऱ्या पुरुषावर जडला जीव, दुसरं लग्न करण्यासाठी मागे लागली अन्...

मुंबई तक

सहा मुलांची आई असलेल्या महिलेला तिच्याच गावातील सात मुलांचा बाप असलेल्या व्यक्तीने प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याचं वृत्त आहे. पण, या प्रेमसंबंधातून महिलेसोबत एक धक्कादायक घटना घडली.

ADVERTISEMENT

दुसरं लग्न करण्यासाठी मागे लागली अन्... (फोटो सौजन्य: Grok AI)
दुसरं लग्न करण्यासाठी मागे लागली अन्... (फोटो सौजन्य: Grok AI)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महिलेचा सुखाचा संसार सुरु असताना दुसऱ्या पुरुषावर जडला जीव

point

दुसरं लग्न करण्यासाठी मागे लागली अन्...

Crime News: उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. सहा मुलांची आई असलेल्या महिलेला तिच्याच गावातील सात मुलांचा बाप असलेल्या व्यक्तीने प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याचं वृत्त आहे. प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर त्या दोघांनी एकमेकांसोबत राहण्यास सुद्धा सुरूवात केली. मात्र, नंतर त्याने महिलेसोबत लग्न करण्यास नकार दिला. याबद्दल संबंधित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली असल्याचं सांगितलं जात आहे. नेमकं प्रकरण काय? 

विवाहित पुरुषासोबत महिलेचे प्रेमसंबंध 

संबंधित प्रकरण हे छजलैट पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका गावातील असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथे राहणाऱ्या एका महिलेचं 17 वर्षांपूर्वीच बिजनौरच्या स्योहारा पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवासी असलेल्या तरुणासोबत लग्न झालं होतं. लग्नानंतर, त्यांना 6 मुलं झाली. पतीसोबत सतत वाद होत असल्याने ती महिला चार वर्षांपूर्वीच आपल्या माहेरी राहण्यासाठी गेली होती. दरम्यान, त्याच गावातील 7 मुलांचा बाप असलेल्या एका विवाहित पुरुषासोबत त्या महिलेचे प्रेमसंबंध निर्माण झाले. 

दोघांमधील प्रेम वाढत गेलं. त्यानंतर, आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी ती महिला सतत तिच्या माहेरी राहण्यासाठी जाऊ लागली. या कारणामुळे, महिलेचे तिच्या पतीसोबत आणखी वाद होऊ लागले. अखेर, ती तिच्या पतीला सोडून कायमचं आपल्या माहेरी राहण्यासाठी आली. माहेरी आल्यानंतर, तिच्या विवाहित प्रियकराने गावातच एका घर भाडेतत्त्वावर घेतलं आणि महिलेला राहण्यासाठी दिलं. 

हे ही वाचा: पैठण : बापाचा खून करुन मृतदेह घरात पुरला,भोळसर आईला धमकी देऊन गप्प केलं, 8 दिवसांनी उग्र वास अन्..

शारीरिक संबंधांनंतर लग्न करण्यास नकार 

संबंधित महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचा सर्व खर्च सुद्धा तिचा प्रियकरच करत होता. याच काळात, पुढे लग्न करण्याचं आश्वासन देऊन तिच्या प्रियकराने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर, त्याने पीडितेला खर्चाला पैसे देण्यास नकार देऊ लागला. शेवटी, त्या पुरुषाने महिलेसोबत लग्न करण्यास नकार दिल्याचा आरोपी पीडितेने केला. महिलेच्या आरोपानुसार, तिच्या प्रियकराचे वडील, आई आणि बहीण तिच्या घरात येऊन पीडितेला मारहाण देखील करायचे. त्यानंतर, त्या महिलेने त्या पुरुषासोबतच लग्न करण्याचा हट्ट धरला आणि पोलीस स्टेशनमध्ये पोहोचून प्रियकराविरुद्ध तक्रार नोंदवली. त्यावेळी, त्या पुरुषासोबतच लग्न करण्याची मागणी पीडितेने केली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp