मदतीसाठी पीडितेला शेतात बोलवलं अन् दारूच्या नशेतच घृणास्पद कृत्य! अखेर, 'त्या' अवस्थेत तरुणीचा मृतदेह...

मुंबई तक

पीडिता शेतातून जात असताना गावातीलच एका तरुणाने तिला मदतीसाठी बोलवलं. त्यावेळी, तिच्यासोबत त्या तरुणाने घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

'त्या' अवस्थेत तरुणीचा मृतदेह
'त्या' अवस्थेत तरुणीचा मृतदेह
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मदतीसाठी पीडितेला शेतात बोलवलं अन्...

point

दारूच्या नशेतच पीडितेसोबत घृणास्पद कृत्य!

point

अखेर, 'त्या' अवस्थेत तरुणीचा मृतदेह

Crime News: उत्तर प्रदेशातील एटा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका 19 वर्षीय तरुणीचा शेतात अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळला. खरं तर, पीडिता शेतातून जात असताना गावातीलच एका 28 वर्षीय तरुणाने तिला मदतीसाठी बोलवलं. त्यावेळी, तिच्यासोबत त्या तरुणाने घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

अर्धनग्न अवस्थेत पीडितेचा मृतदेह 

अखेर, 19 वर्षीय पीडित तरुणीचा मृतदेह एका नाल्याजवळ अर्धनग्न अवस्थेत सापडला. मुलीची अशा पद्धतीने हत्या करण्यात आल्याने संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. आता, गावकरी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करत आहेत. पोलीस सुद्धा या आरोपीच्या अटकेसाठी प्रयत्न करत आहेत. लवकरच हे प्रकरण उघडकीस आणण्याचा पोलिसांनी दावा केला आहे. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: एल्फिन्स्टन पूलाच्या पाडकामासाठी सेंट्रल रेल्वेची 'इतक्या' कोटी रुपयांची मागणी...

दारूच्या नशेत पीडितेवर बलात्कार अन्...

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील 19 वर्षीय तरुणीची हत्या करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एका 28 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. या आरोपी तरुणाने दारूच्या नशेत पीडितेवर बलात्कार केला आणि नंतर, तिचा गळा दाबून तिची निर्घृण हत्या केली. संबंधित आरोपी तरुणाने आपला गुन्हा कबूल केल्याचा पोलिसांनी दावा केला आहे. आता, पोलिसांनी आरोपीला आपल्या ताब्यात घेऊन त्याची तुरुंगात रवानगी केली आहे. 

हे ही वाचा: तू काळा अन् तुझं पोरगं गोरं कसं? मित्रांच्या टोमण्याने तळपायाची आग मस्तकात, थेट सासरवाडीत गेला अन्...

पोलिसांनी दिली माहिती 

तपासादरम्यान, पोलिसांनी सांगितलं की 28 वर्षीय आरोपी तरुणाने पीडितेला लाकडांची मोळी उचलण्यासाठी मदतीसाठी बोलवलं. मदतीच्या बहाण्याने, आरोपी तरुणीला शेतात घेऊन गेला. त्यानंतर, आरोपी तरुणीने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, पीडितेने आरोपीला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता तरुणाने तिचा गळा दाबून खून केला. या घटनेच्या वेळी, आरोपी नशेत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.  

हे वाचलं का?

    follow whatsapp